शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:01 IST

India Pakistan War: गेल्या काही दिवसापासून भारत -पाकिस्तान सीमेवर तणाव सुरू होता, आज दोन्ही देशातील सीमेवर परिस्थिती सुधारत आहे.

India Pakistan War ( Marathi News ): पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर पाकिस्तान लष्कराने हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांना भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करत युद्धविरामची घोषणा केली. पण, त्याच दिवशी रात्री पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान,आज सीमेवर परिस्थिती सामान्य झाली असून गोळीबार झाला नसल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. 

९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

सीमेवरील परिस्थितीची माहिती आज भारतीय लष्कराने दिली. सीमेवर सर्व काही सामान्य आहे. पाकिस्तानकडून कोणताही हल्ला झालेला नाही. गोळीबाराची कोणत्याही घटनेची नोंद झाली नाही, त्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत ही पहिलीच शांत रात्र ठरली.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथून सकाळचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रात्रीनंतर आता सकाळी जनजीवन सामान्य आहे, अशी माहिती लष्कराने दिली. 

९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार

 भारताने या कारवाईत मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांसह १००हून अधिक दहशतवादी यमसदनी पाठवले. ७ ते १० मेदरम्यान शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत हवाई दलाचे सर्व पायलट सुखरूप परतल्याचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले. तर, वेळप्रसंगी कराची बंदरावर जोरदार हल्ल्यासाठी नौदल सज्ज होते, असे व्हाईस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले. ( India Pakistan War )

लष्करी मोहिमांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, या संघर्षात ३५-४० पाकिस्तानी लष्करी जवान ठार करण्यात आले. या कारवाईत भारताचे उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि यापुढे पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Armyभारतीय जवान