India Pakistan War, Operation Sindoor, twitter blocks 8000 accounts: पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरमार्फतपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने काल भारतातील काही ठिकाणी हल्ले करत, १६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यानंतर आज दिवसभरात भारताने पाकिस्तानातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले. याचा परिणाम म्हणून पाकिस्तानने संध्याकाळनंतर भारतातील विविध शहरांवर मिसाईल आणि ड्रोनने हल्ले करण्यास सुरुवात केली. भारताने हे हल्ले परतवून लावले आणि पाकचे ड्रोन आणि लढाऊ विमाने पाडली. मात्र पाकिस्तानकडून चुकीची माहिती पुरवली जाण्याची शक्यता लक्षात घेत भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला.
भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने ८ हजारांहून अधिक एक्स अकाउंट्स ब्लॉक करण्याचे आदेश एक्स व्यवस्थापनाला दिले. भारताबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या एक्स अकाउंट्सवर सरकारने मोठी कारवाई केली. भारत सरकारने आठ हजारांहून अधिक एक्स अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तान आणि पाकिस्तानचा पुळका असलेल्या अनेक देशांतील एक्स अकाऊंटवरून भारताबद्दल चुकीची माहिती दिली जात होती. त्यामुळे भारतीयांची आणि इतर नागरिकांची दिशाभूल केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भारताने पाकिस्तानची तब्बल ८ हजार एक्स अकाऊंट्स बंद करण्याचे आदेश दिले.