India Pakistan War ( Marathi News ) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता.या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोन्ही देशांमध्ये हल्ले सुरू होते त्यावेळी चीनने पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी केली होती. सॅटेलाईटवरील डेटाही शेअर केला होता. संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या 'सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज' या थिंक टँकच्या या अहवालात दोन मोठे खुलासे झाले आहेत. आता चीनच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
चीनने पाकिस्तानसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ते भारतीय सैन्यासमोर टीकू शकले नाहीत. लष्कराने फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले नाहीत तर अचूक हल्ल्यांमध्ये अनेक मोठ्या दहशतवाद्यांना ठार मारले.
चीनने पाकिस्तानला अशी मदत केली
मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या लष्करी तैनातीवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने पाकिस्तानला त्यांचे हवाई संरक्षण आणि रडार प्रणालीद्वारे मदत केली. याशिवाय, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आणि त्यानंतर सुरू झालेल्या संघर्षाच्या १५ दिवसांत चीनने उपग्रहावरुन भारतावर लक्ष ठेवले.
भारताने कोणतीही हवाई कारवाई केली की तर त्याची आधीच माहिती पाकिस्तानला मिळत होती, अशी यंत्रणा चीनने रडारची केली होती”, असे थिंक टँक सीजेडब्ल्यूएसचे महासंचालक मेजर जनरल अशोक कुमार म्हणाले.
पाकिस्तानचा नकार
पाकिस्तानने फक्त चीनकडून मिळालेल्या शस्त्रांचा वापर केल्याचा दावा केला. पाकिस्तानचे दावे उघड केले आहेत. चीनने पाकिस्तानला धोरणात्मक, गुप्तचर आणि तांत्रिक मदत दिल्याचेही सांगण्यात आले.
चीनने या संघर्षाला त्यांच्या संरक्षण यंत्रणेची 'लाइव्ह फायर टेस्टिंग' म्हणून पाहिले. चीनच्या अनेक प्रणाली "अपयशी" सिद्ध झाल्या आहेत. भारताचे संरक्षण नेटवर्क पाकिस्तानचे ड्रोन हल्ले प्रभावीपणे हाणून पाडण्यास पूर्णपणे सक्षम होते, असंही या अहवालात म्हटले आहे.