पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यापासूनच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. त्यानंतर पाकिस्तानकडून पिसाळल्यासारखे हल्ले केले जात आहेत. हे हल्ले जम्मू काश्मिरातील नागरी वस्त्यावर केले जात असून, एक हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जम्मूतील पुंछ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील गावांवर सध्या पाकिस्तानी लष्कराकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. भारताने ज्या रात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्याच दिवशी पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले.
घरावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद
एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात एका घरावर हल्ला होताना दिसत आहे. घराच्या भिंतीवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्वकाही सुरळीत दिसत आहे. घरासमोर एक गाडी उभी आहे.
वाचा >>'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली
काही वेळाने अचानक घरावर उखळी तोफ येऊन पडते. त्यानंतर इतका मोठा स्फोट होतो की, काहीच दिसेनास होतं.
व्हिडीओ बघा
भारतीय जवान शहीद
ऑपरेशन सिंदूरदरम्यान एक भारतीय जवान शहीद झाला आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नझीर यांनी ट्विट करून याबद्दल शोक व्यक्त केला आहे. एम. मुरली नाईक असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.
एम. मुरली नाईक याला जम्मू काश्मीर खोऱ्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान वीरमरण आले. तो आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील थांडा गावातील होता.
दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह आणि संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्यासोबत बैठक घेतली.