शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

I.N.D.I.A. आघाडीनं तयार केली समन्वय समिती, या 13 नेत्यांना दिली मोठी जबाबदारी; थीमही ठरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:02 IST

मुंबई येथे सुरू असलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 

विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीने वेगवेगळ्या पक्षांच्या 13 नेत्यांची समन्वय समिती तयार केली आहे. या समितीत शरद पवार, स्टॅलिन, अभिषेक बॅनर्जी, हेमंत सोरेन आणि राघव चड्ढा यांच्यासह एकूण 13 नेत्यांचा समावेश असेल. मात्र अद्याप, आघाडीचा संयोजक कोण असणार? यासंदर्भात निर्णय झालेला नाही. केसी वेणुगोपाल, संजय राऊत, तेजस्वी यादव, जावेद खान, लल्लन सिंह, डी राजा, उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांचाही या समितीत समावेश असेल. मुंबई येथे सुरू असलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 

"जुडेगा भारत, जीतेगा इंडिया"महत्वाचे म्हणजे, I.N.D.I.A. कडून सर्व प्रकारचा संवाद आणि माध्यमांसंदर्भातील रणनीती, तसेच कॅम्पेनची थीम वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल. ही थीम "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया", अशी असेल. हेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

अशी आहे I.N.D.I.A. ची रणनीती? -लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये संयुक्त रॅलीचे आयोजन केले जाईल. सार्वजनिक प्रश्नांवर या रॅली केल्या जातील. याशिवाय, विविध राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया गिव्ह अँड टेक भावनेने पूर्ण केली जाईल. तसेच, आगामी लोकसभानिवडणूक सर्व पक्ष एकत्रितपणे लढतील, असा निर्ययही या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.NDA ला सत्तेवरून दूर करण्यासाठी मंथन -एकीकडे मुंबईत 28 विरोधी पक्षांचे नेते NDA आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटविण्यासाठी मंथन करत असतानाच, दुसरीकडे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय पटलावर बॅक टू बॅक चाली चालत आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष आधिवेशन बोलावले आहे. हे आधिवेश बोलावून सरकारने विरोधी पक्षांना, सरकारच्या मनात नेमके काय चालले आहे? यासंदर्भात विचार करायला भाग पाडले आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी तर होणार नाहीत ना? कारण, एक देश एक निवडणूकी संदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे.

 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक