CAA : जगात हिंदूंसाठी भारत हा एकमेव देश - विजय रूपानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 07:13 IST2019-12-26T07:12:59+5:302019-12-26T07:13:16+5:30

Citizen Amendment Act : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या समर्थनासाठी अहमदाबादेतील साबरमती

India is the only country for Hindus in the world - Vijay Rupani | CAA : जगात हिंदूंसाठी भारत हा एकमेव देश - विजय रूपानी

CAA : जगात हिंदूंसाठी भारत हा एकमेव देश - विजय रूपानी

सुरत/वडोदरा : मुस्लिमांना त्यांच्या इच्छेनुसार राहण्यासाठी जगात १५० देश आहेत, तर हिंदूंसाठी फक्त एक देश आहे, तो म्हणजे भारत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले.

नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या समर्थनासाठी अहमदाबादेतील साबरमती आश्रमापासून मंगळवारी निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व रूपानी यांनी केले. मंगळवारी भाजपने राज्यात विविध ६२ ठिकाणी या कायद्याला पाठिंबा देणारे मोर्चे काढले. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मेहसानात या मोर्चाचे नेतृत्व केले. मोठ्या सभेला मार्गदर्शन करताना रूपानी म्हणाले की, भारतात मुस्लिम लोक आनंदी असून, त्यांची लोकसंख्या देशाची घटना धर्मनिरपेक्ष असल्यामुळे ९ टक्क्यांवरून १४ टक्के झाली आहे. ते भारतात सन्मानाने जीवन जगत आहेत. पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या २२ टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आली आहे. कारण त्यांचा छळ झाला, बलात्कार झाले, त्यांची मालमत्ता नष्ट केली गेली.

Web Title: India is the only country for Hindus in the world - Vijay Rupani