शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 3:15 PM

Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas : रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये दोन रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींविरोधात 'बनावट' पासपोर्ट मिळवून फसवणुकीचा प्रकार दाखल करण्यात आला आहे.

चंदीगड : राज्यात आश्रय घेणाऱ्या रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींबाबत माहिती एकत्र केली जात आहे. तसेच, भारत काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही येऊन राहायला लागेल', असे विधान हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी केले. शुक्रवारी रोहिंग्यांच्या प्रश्नावर अनिल विज यांनी हे भाष्य केले. (India not a dharamshala': Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas)

विशेष म्हणजे, जम्मूमध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या १६८ रोहिंग्यांना तुरुंगात धाडण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती नुकतीच अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर अनिल वीज यांनी रोहिंग्या शरणार्थींबाबत असे विधान केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. हरयाणाच्या मेवातमध्येही रोहिंग्यांची उपस्थिती दिसून येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रोहिंग्याबाबत अनिल विज यांनी असे विधान केले आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये दोन रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींविरोधात 'बनावट' पासपोर्ट मिळवून फसवणुकीचा प्रकार दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूत राहणाऱ्या रोहिंग्या समुदायातील लोकांची ओळख पटवली जात आहे. याचवेळी दोन रोहिंग्या व्यक्तींकडे बनावट पासपोर्ट आढळून आला होता. रहमान आणि गफूर नावाच्या या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारी अहवालानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये १३ हजार ६०० नागरिक अवैधरित्या राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील बहुतांश नागरिक हे रोहिंग्या असल्याचे सांगितले जाते. रोहिंगे आम्हाला त्रास देत नाहीत, मात्र ते भारतात आलेच कसे, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं तर इतर देशांतून नागरिक इकडे येत असतील, तर आपल्या सीमा सुरक्षित आहेत काय, असा सवाल उपस्थित होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Anil Vijअनिल विजHaryanaहरयाणाJammu Kashmirजम्मू-काश्मीरRohingyaरोहिंग्या