शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 12:38 IST

हा रस्ता बनवण्यामागे टिनकर खिंडीतून नेपाळ आणि चीनमधील व्यापारास चालना देण्याचा हेतू आहे. या रस्त्याचा उर्वरित भाग आता नेपाळ आर्मी पूर्ण करणार आहे.

ठळक मुद्देनेपाळने भारताशी असलेला संघर्ष आणखी वाढवण्याचं जवळपास निश्चित केलेलं दिसतंय.पहिल्यांदा आपल्या अधिकृत नकाशामध्ये भारताची क्षेत्रे दाखवली आणि आता 12 वर्षांनंतर भारतीय सीमेवरील रस्त्याचं काम पुन्हा सुरू केलं आहे. धारचुला-टिनकर या 130 किमीच्या रस्त्याच्या भागातील 50 किलोमीटरचा रस्ता हा उत्तराखंडशी जोडलेला आहे.

काठमांडूः नेपाळनेभारताशी असलेला संघर्ष आणखी वाढवण्याचं जवळपास निश्चित केलेलं दिसतंय. पहिल्यांदा आपल्या अधिकृत नकाशामध्ये भारताची क्षेत्रे दाखवली आणि आता 12 वर्षांनंतर भारतीय सीमेवरील रस्त्याचं काम पुन्हा सुरू केलं आहे. हा रस्ता उत्तराखंडमधील धारचुला गावातून जातो. धारचुला-टिनकर या 130 किमीच्या रस्त्याच्या भागातील 50 किलोमीटरचा रस्ता हा उत्तराखंडशी जोडलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकल्पाला 2008 मध्ये परवानगी देण्यात आली होती. हा रस्ता बनवण्यामागे टिनकर खिंडीतून नेपाळ आणि चीनमधील व्यापारास चालना देण्याचा हेतू आहे. या रस्त्याचा उर्वरित भाग आता नेपाळ आर्मी पूर्ण करणार आहे.नेपाळला हा रस्ता आताच का आठवला?नेपाळला हा रस्ता आताच का आठवला असेल, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पण त्याला कारणही तसंच आहे. 8 मे रोजी धारचुला ते लिपुलेख खिंडीला जोडणार्‍या 80 किमी लांबीच्या रस्त्याचे भारताने उद्घाटन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तवाघाट-लिपुलेख मार्गाचे उद्घाटन झाले. कैलास मानसरोवराला भेट देण्यासाठी या रस्त्यामुळे कमी वेळ लागेल, असे त्यांनी म्हटले होते.ठेकेदार काम सोडून पळाला होताहा रस्ता गेल्या 12 वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. याचा केवळ 43 किमीचा रस्ता तयार झाला होता. इथला भूभाग हा अत्यंत धोकादायक तर आहेच, पण हवामानाचाही भरवसा नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षांपूर्वी रस्ता तयार करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे तोटा वाढत होता, त्यामुळे कंत्राटदारही काम सोडून पळून गेला होता. नेपाळ सरकारचा असा विश्वास आहे की, या रस्त्याच्या बांधकामामुळे केवळ व्यापारच वाढणार नाही, तर यात्रेकरू आणि पर्यटकांची संख्याही वाढेल.नेपाळ आर्मी तयार करत आहे बेस कॅम्प भारताने धारचुला-लिपुलेक रस्ता खुला केला, तेव्हा नेपाळमध्ये जोरदार विरोध झाला. तेथील सरकारने सांगितले की, हा पास नंतर नेपाळच्या हद्दीत येतो. हा रस्ता पूर्णपणे भारतीय हद्दीत असल्याचे भारताने स्पष्ट केले होते. नेपाळला हरकत होती तर त्यांनी रस्ता बांधत असतानाच आक्षेप नोंदवायला हवा होता. रस्ता प्रकल्प सुरू करण्यामागील अधिकृत कारण म्हणजे टिनकर व छांगरू लोक ये-जा करू शकतील. उर्वरित राहिलेला 87 किमी रस्ता पूर्ण करण्यासाठी नेपाळ सैन्याने घाटियाबघर येथे तळ शिबीर तयार करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी