शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus: ...तर देशात जूनपर्यंत कोरोनामुळे रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 15:33 IST

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. (CoronaVirus) 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तत्काळ योग्य प्रयत्न करण्यात आले नाही, तर, भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्बात लॅन्सेट कोविड-19 कमिशनकडून एका रिपोर्टमध्ये धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रिपोर्टच्या सुरुवातीच्या समीक्षेनुसार, भारतात कोरोना व्हायरसमुळे रोज 1,750 मृत्यू होऊ शकतात. तसेच ही संख्या वाढून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 2,320 वर पोहोचू शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. (India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet)

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. 

असिम्पटोमॅटिक प्रकरण वाढवतायत महामारी -पहिल्या लाटेच्यातुलनेत दुसरी लाट ही दोन महत्वाच्या गोष्टींनी वेगळी आहे. एक म्हणजे, कोरोना रुग्णांच्या वाढत्या ताज्या आकडेवारीचा दर फार अधिक आहे. फेब्रुवारीपासून रोज येणारे 10,000 रुग्ण वाढून एप्रिलपर्यंत 80,000 होण्यात 40 दिवसांपेक्षाही कमी कालावधी लागला. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा कालावधी 83 दिवसांचा होता. दोन म्हणजे, कोरोना व्हायरसचे रुग्ण असिम्टोमॅटिक अथवा हलके लक्षण असणारे आहेत. यामुळे, रुग्णालयात भरती होणे आणि मृत्यू दर तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. 

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

ट्रान्समिशन चेन तोडणे आवश्यक -आर्थिक दृष्ट्या भारताला टेस्टिंगवर 7.8 बिलियन डॉलर्सहून अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. रिपोर्टनुसार, अर्थव्यवस्था आणि लोकांची रोजी-रोटी कमितकमी प्रभावित होईल या दृष्टीने, ट्रान्समिशन चेन तोडण्यासाठी आणि नावा संक्रमण दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. एवढेच नाही, तर लसीकरणाची गती वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.  

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

कठोर उपाय वेळेची आवश्यकता -या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की 'गेल्या वर्षापासून आपल्याला धडा मिळाला आहे, की भारतात आणि इतर देशांत प्रबळ राजकीय इच्छाशक्ती चांगले परिणाम देऊ शकते. आपल्याला विश्वास आहे, की आता भारताने उचललेले ठोस पाऊल भारताला दुसऱ्या लाटेतून सावरेल, तसेच कोविड-19 संक्रमणाच्या अतिरिक्त लाटेलाही रोखेल. याशिवाय, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी, 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचेही लसिकरण करण्याचा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत