"भारत भूगोलाचं नाही, स्वभावाचं नाव..."; मोहन भागवत यांनी सांगितले हिंदूंचे चार प्रकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 02:08 IST2026-02-08T02:06:54+5:302026-02-08T02:08:04+5:30
"...असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे."

"भारत भूगोलाचं नाही, स्वभावाचं नाव..."; मोहन भागवत यांनी सांगितले हिंदूंचे चार प्रकार!
मी अनेक वेळा मुस्लिमांसोबत संवाद साधतो, ख्रिश्चनांसोबत संवाद साधतो. आपणही हिंदूच आहात, असे म्हटल्यावर ते म्हणतात. नाही-नाही आम्ही हिंदू नाही. ठीक आहे, मग कोण आहात? हिंदवी आहोत. एकच गोष्ट आहे. लोक मला सल्ला देतात की आपण भारतीय म्हणत जा. समानार्थी शब्द आहे. कुणी भारतीय म्हणत असेल, हिंदवी म्हणत असेल, आम्ही सहमत आहोत. दोन्ही समान शब्द आहेत. पण 'हिंदवी' आणि 'भारतीय' होणे म्हणजे काय? केवळ या देशाचे नागरीक होणे नाही. भारताचा एक स्वभाव आहे. भारत भूगोलाचे नाव नाही, ते स्वभावाचे नाव आहे, हे जोडून ठेवणारा आपला स्वभाव पुन्हा निर्माण करणे आणि निस्वार्थ बुद्दीने, प्रामाणिकपणे सर्वांनी मिळून शिस्तबद्धपद्धतीने देश मोठा करणे. कारण आपला देश मोठा झाल्याने जग मोठे होईल आणि सर्वात प्राचिन असल्याने, आपले चरित्र असे असायला हवे की, दुसऱ्या देशातील लोक आपले चरित्र पाहून आपल्या जीवनाची विद्या शिकतील. उदाहरणांतून लोकांना शिकवणे. आपल्याला जगाची महाशक्ती बनायचे नाही. तर विश्व गुरू बनायचे आहे. असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत "आरएसएसचा १०० वर्षांचा प्रवास: नवीन क्षितिज" या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भागवत यांनी भारतीय समाजाच्या स्वभावासंदर्भात बोलताना हिंदूंच्या चार प्रकारांवरही भाष्य केले.
भागवत म्हणाले, "असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे. आता पुन्हा ती वेळ आली आहे. अनेक प्रकारचे प्रयोग करत आता जग अडखळत आहे. त्यांना अर्थ काम आणि मोक्षही माहीत आहे. मात्र, अर्थ-काम साधत मोक्षापर्यंत घेऊन जाणारा धर्म त्यांना माहीत नाही. त्यांना रिलिजन माहीत आहे. धर्म माहीत नाही. धर्म आणि रिलिजन वेगळी आहे. त्यांना व्यक्ती हीत, समाजहित, पर्यावरण माहीत आहे. पण व्यक्तीची उन्नती, समाजाचा विकास आणि पर्यावरणणाची हाणीही होऊ नये, हे सर्व एकाचवेळी कसे करायचे? त्यांना परमेष्टी माहीत नाही. ही जी जोडणारी गोष्ट आहे, तिच्या आधारे आपला देश वैभव संपन्न, सामर्थ संपन्न आणि सर्व हितकारी स्वरूप उभे करणे, तरच जगाला आजच्या समस्येचे पूर्ण उत्तर मिळेल, अर्धवट असलेले जग पूर्ण होईल."
चार प्रकारचे हिंदू कोण? -
भागवत पुढे म्हणाले, "भारतीय समाजाच्या स्वभावासंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, भारतातील मुस्लीम आणि ख्रीश्चन, हे इतर देशातील मुस्लीम आणि ख्रिश्ननांप्रमाणे नाहीत. त्यांचे वेगळेपण कुठूण आले? ते भारतीय आहे." भागवत पुढे म्हणाले, "यामुळेच तर आम्ही म्हणतो, की चार प्रकारचे हिंदू आहेत. आणखी तर कुणी नाहीत. एक आहेत, 'गर्व सें कहों हम हिंदू है.' दुसरे आहेत, आहोत आम्ही हिंदू आणि राहूत, गर्व वैगेरे कशाला, असतात लोक, आम्हीही आहोत, राहू. तिसरे आहे. 'जोरसे मत बोलो हम हिंदू है,' घरात येऊन विचाराल तर सांगू, बाहेर सांगणार नाही, आहेत त्यांची काही कारणं. आणि चौथे म्हणजे, जे विसरले आहेत. ज्यांना, विसर पाडला गेला, त्यांनी विस्मृतीतच रहावे, अशी व्यवस्था असते. तसे करणारे लोक असतात. आणखी लोकांनी विसरावे आणि तिकडे सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
"कारण भारत मोठा झाला, तर जगातील काही स्वार्थी शक्तींच्या स्वार्थाचे दुकान बंद हईल. यामुळे सर्व जण आपल्याशी मैत्रीही करत आहेत आणि वेळो वेळी शत्रूत्वही दाखवतात. या सर्वांचा उपाय म्हणजे सामर्थसंपन्न राष्ट्र. त्यासाठी संघटित, गुणवान समाज असावा लागतो," असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले."