शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'भारत इंटरेस्टींगय... 1 कप कॉफीसाठी 250 ₹ अन् 2 इडल्या फक्त 3.50 रुपये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 21:42 IST

देशात सध्या नवीन जनरेशनप्रमाणे ट्रेंड सेट होत आहेत. सीसीडीसारखे कॅफे शॉप उघडले जात आहेत. मॉलमध्ये पिझ्झा बर्गर खाणाऱ्यांची संख्या वाढलीय. महागड्या स्वरुपात हे स्नॅक्स फूड चवीनं खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देउद्योजक हर्ष गोएंका यांनी ट्विट करुन काही फोटो शेअर केले आहेत. त्यात, या शहरी आणि ग्रामीण भागातील दुनियादारी, किंमती, महागाई यांचं वर्णन केलंय. 

भारत - विविधतेनं नटलेला देश म्हणजे भारत, विविध धर्म, जाती पंथ आणि संस्कृतीचा एकत्र देश म्हणजे भारत. म्हणून, विविधतेनं नटलेला देश म्हणून, सर्वधर्मीयांचा देश म्हणून भारताची जगभर ख्याती आहे. देशात दर 30 किमीवर भाषेत झालेला बदल दिसून येतो. तर, प्रांतवार रचनेमुळे विविध प्रातांच्या विविध भाषाही येथील आकर्षण ठरतं. संस्कृती, खान-पान आणि पोशाख हेही येथील विशेषत: ठरते. उद्योजक हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या फोटोवरुन हेही लक्षात येईल. 

देशात सध्या नवीन जनरेशनप्रमाणे ट्रेंड सेट होत आहेत. सीसीडीसारखे कॅफे शॉप उघडले जात आहेत. मॉलमध्ये पिझ्झा बर्गर खाणाऱ्यांची संख्या वाढलीय. महागड्या स्वरुपात हे स्नॅक्स फूड चवीनं खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, दुसरीकडे स्ट्रीट फूड खाणारेही आहेत, पोटाची भूक भागविण्यासाठी स्वस्तात मस्त हात गाड्यावरील फूडचीही चव चाखणारे आहेत. या दोन्ही संस्कृतीत मोठा फरक आहेत. शहरात तुम्हाला दोन्ही संस्कृती पाहायला मिळतील. पण, ग्रामीण भागात केवळ हातगाडीवरीलच संस्कृती पाहायला मिळेल. उद्योजक हर्ष गोएंका यांनी ट्विट करुन काही फोटो शेअर केले आहेत. त्यात, या शहरी आणि ग्रामीण भागातील दुनियादारी, किंमती, महागाई यांचं वर्णन केलंय. तामिळनाडूच्या इरोड येथील इडली मार्केटचे हे फोटो आहेत. येथे दररोज 20 हजार इडल्या विकल्या जातात. येथील 2 इडल्यांची किंमत 3.5 रुपये असून तुम्ही सांबर/चटनी घेतल्यास ती किंमत 6.50 रुपये द्यावे लागतात. भारत हा इंटरेस्टींग देश आहे. जेथे एका कॉफीच्या कपासाठी 250 रुपये मोजावे लागतात, तेथेच दोन यमी इडल्या फक्त 3.50 रुपयांत मिळतात, असे ट्विट गोएंका यांनी केले आहे. 

गोएंका यांनी या इडली मार्केटचे, येथील गर्दीचे आणि येथील किंमतीचे आश्चर्य वाटले आहे. म्हणूनच त्यांनी येथील मार्केटचे, विक्रेत्यांचे फोटो शेअर करत कौतुक केलंय. 

 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूfoodअन्नIndiaभारत