भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 21:35 IST2025-09-12T21:34:30+5:302025-09-12T21:35:56+5:30
"रॉकेट्स तयार आहेत. आम्ही ती वेळेवर पोहोचवू"

भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
ऑपरेशन सिंदूरदरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची ताकद आणि चमत्कार संपूर्ण जगाने पाहिला. या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारताने अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. आता भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची तिसरी खेप चीनच्या शेजारील देशाला पाठवणार आहे. हा देश म्हणजे फिलीपिन्स. फिलीपिन्सला भारताकडून मोठ्या प्रमाणावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे मिळाल्याने चीनचे टेन्शन वाढणार आहे.
"रॉकेट्स तयार आहेत. आम्ही ती वेळेवर पोहोचवू" -
यापूर्वी, गेल्या वर्षाच्या सुरुवातीला, भारताने फिलीपिन्सला क्षेपणास्त्रांची पहिली खेप आणि नंतर दुसरी खेप पाठवली होती. २०२२ मध्ये दोन्ही देशांमध्ये ३७५ मिलियन डॉलर्सचा करार झाला होता. याअंतर्गत भारताकडून फिलीपिन्सला सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे देण्यात येणार होती. ब्रह्मोस एरोस्पेस संयुक्त उपक्रमाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक जयतीर्थ जोशी यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, "रॉकेट्स तयार आहेत. आम्ही ती वेळेवर पोहोचवू."
फिलीपिन्स स्वसंरक्षणासाठी ही क्षेपणास्त्रे किनारी भागात तैनात करणार आहे -
महत्वाचे म्हणजे, दक्षिण-चीन सागरात तणाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतानाच फिलिपिन्सला ही क्षेपणास्त्रे दिली जात आहेत. या सागरावर चीन आपला हक्का सांगत असतो. यामुळेच अमेरिकेशीही त्याचा वाद आहे. फिलीपिन्स स्वसंरक्षणासाठी ही क्षेपणास्त्रे किनारी भागात तैनात करणार आहे.