शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य मिळाले २०१४ साली; कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 06:56 IST

अभिनेत्रीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : आपल्याला १९४७ जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होती. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ साली (भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर) मिळाले, असे वक्तव्य केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. त्यावर मुलाखतकर्त्या महिलेने म्हणून तर लोक तुम्हाला भगवान मानतात, असे उद्गार काढल्याने लोकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. तिचे हे वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

चारच दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या कंगनाने आजपर्यंत अशीच अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. देशाला १९४७ जे मिळाले ती भीक होती, असे म्हणणे म्हणजे सर्व स्वातंत्र्यसेनानींचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर असे वक्तव्य केल्याबद्दल कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा, अशी मागणीही काहींनी केली आहे. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी केेलेला त्याग व बलिदान याला भीक म्हणणे हा त्यांचाच नव्हे, तर तमाम भारतीयांचा अपमान आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.

मुंबई पोलिसांत तक्रार 

काँग्रेस, भाजप, अकाली दर, कम्युनिस्ट अशा सर्व पक्षांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आम आदमी पार्टीने मुंबईत पोलिसांकडे तक्रार केली असून, कंगनाच्या वक्तव्याबद्दल तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी केला निषेध

कंगना रणौतच्या या वक्तव्याचा भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, कधी महात्मा गांधी यांचा त्याग व तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा अपमान. याला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?

अकाली दल म्हणते ही मानसिक दिवाळखोरी

अकाली दलाचे वरिष्ठ नेते मनजिंदर सिरसा म्हणाले की, राणी लक्ष्मीबाईंची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने स्वातंत्र्याला भीक म्हणजे हे तिच्या मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतIndiaभारतBJPभाजपा