जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 07:11 AM2021-03-22T07:11:02+5:302021-03-22T07:11:34+5:30

लष्करावर भरमसाठ खर्च करणारी अमेरिका ७४ अंकांनी जगात दुसऱ्या स्थानी, तर रशिया ६१ अंकांनी तिसऱ्या आणि भारतीय लष्कर  जगातील सामर्थ्यशाली लष्करात ६१ अंकांनी चौथ्या स्थानी आहे

India is the fourth most powerful army in the world; The strongest is China, followed by the United States and Russia | जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा

जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा

googlenewsNext

नवी दिल्ली : ‘मिलिटरी डायरेक्ट’ वेबसाइटने केलेल्या अध्ययनानुसार जगात सर्वांत सामर्थ्यवान लष्कर चीनचे आहे, तर  भारतीय लष्कर जगातील सामर्थ्यशाली लष्कराच्या क्रमावारीत चौथ्या  स्थानी आहे.

लष्करावर भरमसाठ खर्च करणारी अमेरिका ७४ अंकांनी जगात दुसऱ्या स्थानी, तर रशिया ६१ अंकांनी तिसऱ्या आणि भारतीय लष्कर  जगातील सामर्थ्यशाली लष्करात ६१ अंकांनी चौथ्या स्थानी आहे. या पंक्तीत फ्रान्सचे लष्कर ५८ अंकांनी पाचव्या क्रमांकावर आहे.
‘मिलिटरी डायरेक्ट’ वेबसाइटच्या अग्रणी दहा देशांच्या लष्करांत ब्रिटन ४३ अंकांनी नवव्या क्रमांकावर आहे.

या अध्ययनात म्हटले आहे की, आर्थिक तरतूद, सक्रिय आणि असक्रिय सैनिकांची संख्या, हवाई, सागरी आणि भूप्रदेश आणि आण्विक संसाधन, सरासरी वेतन आणि उपकरणांची संख्या या घटकांनुसार  ‘लष्करी सामर्थ्य निर्देशांक तयार करण्यात आला आहे. या घटकांनुसार चीन १०० पैकी ८२ अंकांनी जगातील सर्वांत सामर्थ्यवान लष्कर अग्रणी आहे. एकूण लष्करासाठी आर्थिक तरतूद, सैनिक, तसेच वायू आणि नौदलाच्या क्षमतेवर अधारित अंकानुसार एखाद्या   युद्धात चीन बाजी मारू शकते. या वेबसाइटनुसार जगभरात अमेरिका लष्करावर सर्वात अधिक ७३२ अब्ज डॉलर खर्च करतो. लष्करी खर्चाच्या दृष्टीने चीन दुसरा असून, चीन २६१ अब्ज डॉलर खर्च करतो, तर भारत लष्करावर ७१ अब्ज डॉलर खर्च करतो. एखाद्या सागरी युद्धात चीन विजयी होईल. हवाई युद्धात अमेरिका आणि जमिनी युद्धात रशिया विजयी होईल.

हवाई युद्ध झाल्यास अमेरिका जिंकू शकते... 

हवाई युद्ध झाल्यास अमेरिका जिंकू शकते.  कारण अमेरिकेकडे  १४,१४१ लढाऊ विमाने आहेत.  रशियाकडे ४,६८२ आणि चीनने ३,५८७ लढावू विमानाचा ताफा आहे.  जमिनीवरील युद्धात रशिया बलान आहे. कारण रशियाकडे   ५४,८६६ लष्करी वाहने आहेत,  अमेरिकेकडे ५०,३२६ आणि चीनकडे ४१,६४१ लष्करी वाहनांचा ताफा आहे. सागरी  युद्ध झाल्यास चीनची सरशी होऊ शकते. कारण चीनने ४०६ लढावू जहाज आहेत. तुुलनेत रशियाजवळ २७८, तर अमेरिका आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यात २०२ लढावू जहाजे आहेत, असे या वेबसाइटने म्हटले आहे.

Web Title: India is the fourth most powerful army in the world; The strongest is China, followed by the United States and Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.