Prakash Javadekar: जय हो! कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे, आतापर्यंत ८.७० कोटी लोकांचं लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:03 IST2021-04-08T14:47:45+5:302021-04-08T15:03:31+5:30
corona vaccination in India: India fastest in vaccination against Covid-19 USA also left behind Prakash Javadekar: कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं असून भारत संपूर्ण जगात सर्वात वेगानं कोरोना विरोधी लसीकरण करणारा देश ठरला आहे

Prakash Javadekar: जय हो! कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे, आतापर्यंत ८.७० कोटी लोकांचं लसीकरण
corona vaccination in india: कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं असून भारत संपूर्ण जगात सर्वात वेगानं कोरोना विरोधी लसीकरण करणारा देश ठरला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. भारतात दर दिवशी सरासरी ३० लाख ९३ हजार ८६१ जणांचं लसीकरण सुरू आहे. तर आतापर्यंत देशात ८ कोटी ७० लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. India fastest in vaccination against Covid-19 USA also left behind Prakash Javadekar
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना लसीकरणात दुजाभाव का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा केंद्राला सवाल
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही याबाबतच एक ट्विट केलं आहे. कोरोना विरोधी लसीकरणात भारतानं अमेरिकेलाही मागे टाकून जगात अव्वल स्थान मिळवलं आहे, अशा आशयाचं ट्विट जावडेकर यांनी केलं आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.
A reassuring news as India surpasses USA to become the fastest vaccinating country in the world.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 8, 2021
Under PM @narendramodi 's leadership, lets all #Unite2FightCorona .
दवाई भी, कड़ाई भीhttps://t.co/8STCl8q7PC
कुणाला किती डोस मिळाले?
देशात आतापर्यंत ८९ लाख ६३ हजार ७२४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५३ लाख ९४ हजार ९१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. फ्रंट लाइन वर्कर्समधील ९७ लाख ३६ हजार ६२९ जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आलाय आणि ४३ लाख १२ हजार ८२६ जणांना दुसरा डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याशिवाय ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये आतापर्यंत ३ कोटी ५३ लाख ७५ हजार ९५३ ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याच वयोगटातील एकूण १० लाख ७८७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्याचं काम पूर्ण झालं आहे.
देशात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार देशातील ४५ वर्ष ते ६० वर्षांपर्यंतच्या एकूण २ कोटी १८ लाख ६० हजार ७०९ लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ४ लाख ३१ हजार ९३३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ३३ लाखांहून अधिक कोरोना लसीकरण पार पडलं आहे.