शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राजकोटमध्ये भारत - द. आफ्रिका संघाच्या खेळाडूंचा मार्ग रोखू - हार्दिक पटेल

By admin | Updated: October 17, 2015 11:21 IST

गुजरातमधील पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उद्या राजकोटमध्ये होणा-या क्रिकेट सामन्याच्यावेळी भारत व दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंचा रस्ता अडवण्याची धमकी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १७ - गुजरातमधील पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उद्या राजकोटमध्ये होणा-या क्रिकेट सामन्याच्यावेळी भारत व दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंचा रस्ता अडवण्याची धमकी दिली आहे. उद्या ( १८ ऑक्टोबर) होणा-या वन-डे सामन्यात जाण्यापासून आम्हाला रोखण्यात आले तर आम्हीही दोन्ही संघांना मैदानात जाऊ देणार नाही, असे हार्दिकने म्हटले आहे. 
सामन्यादरम्यान आमच्या समाजाच्या प्रेक्षकांनी  घोषणा करू नयेत म्हणून त्यांना तिकिटे देण्यापासून वंचित ठेवले जात आहे. अनेक तिकिटे शिल्लक असूनही सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने सामन्याची तिकिटे संपल्याचे जाहीर केले आहे, असा आरोप हार्दिकने केला आहे. जर आम्हाला तिकिटे देण्यात आली नाहीत तर खेळाडूंचे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य आहे तिथपासून ते स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर आंदोलन करत त्यांना स्टेडियमवर जाण्यापासून रोखण्यात येईल असे हार्दिकने जाहीर केले.
हार्दिक पटेलने दिलेल्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्टेडियममध्ये प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियमच्या गॅलरीत मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात येणार आहेत व अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.