नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची भारताची तयारी आहे, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे. अभिनंदपर संदेशाला दिलेल्या उत्तरात भारताने असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी स्पष्ट केले.एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तात असा दावा केला होता की, पाकने चर्चेसंबंधी नव्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी विभागीय समृद्धीसाठी पाकिस्तानसह सर्व देशांशी चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि विदेशमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या अभिनंदपर संदेशाला प्रचलित राजनैतिक पद्धतीनुसार पंतप्रधान मोदी आणि विदेशमंत्र्यांनी उत्तर दिले. उत्तरादाखल संदेशपत्रात स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले की, पाकिस्तानसह सर्व शेजारील देशांशी सहकार्यपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे.
भारताने फेटाळला पाकचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:23 IST