नवी दिल्ली - पूर्वी लडाखमध्ये पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर भारतीय जवानांनी फायरिंग केल्याचे चीनने म्हटले आहे. मात्र चीनचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. तसेच, चीन स्वतःच फायरिंग करून भारतीय जवानांवर आरोप करत आहे. मात्र, भारताने पुन्हा एकदा खोटारड्या चीनचा बुरखा फाडला आहे. यासंदर्भात भारताने एक निवेदन जारी करत, पीएलएच्या सैनिकांनी डिवचण्याचे काम केले आहे. तसेच भारतीय जवानांनी सीमेवर गोळीबार केलेला नाही आणि सीमाही ओलांडलेली नाही. असे भारताने म्हटले आहे. मात्र, काही ठिकाणी पिपल्स लिब्रेशन आर्मीने गोळीबार केला आहे.
चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री दावा केला, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील बाजूस भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला उत्तर देत आज मंगळवारी भारतीय लष्कराने म्हटले आहे, की चिनी सैनिकांनी स्वतःच गोळीबार केला आणि आरोप आमच्यावर लावत आहे. एवढेच नाही, तर चीन सातत्याने कराराचे उल्लंघण करत आहे. तसेच सैन्य आणि राजकीय पातळीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे. तरीदेखील चीन अशा प्रकारचे कृत्य करत आहे.
निवेदनानुसार, '07 सप्टेंबर 2020 रोजी चिनी सैनिकांनी एलएसीवर आमच्या एका फॉरवर्ड पोझिशनजवळ येण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना त्यांच्याच सैनिकांनी रोखले, तेव्हा चिनी सैनिकांनी आपल्याच सैनिकांना चिथावणी देण्यासाठी हवेत गोळीबार केला. अशा चिथावणीखोर कृत्यानंतरही भारतीय जवानांनी सय्यम दाखवला आणि आपल्या परिपक्व व्यवहाराचा परिचय दिला.'
या निवेदनात पुढे म्हणण्यात आले आहे, की भारतीय जवान शांतता काय ठेवण्यासाठी वचनबद्ध आहेत. मात्र देशाच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठीही आम्ही पूर्णपणे तयार आहोत. याशिवाय, चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडने जारी केलेले निवेदन हे त्यांच्याच नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी आहे, असेही भारतीय लष्काराच्या निवेदनात म्हण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!
खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ