शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:44 AM

-३० डिग्री तापमानात ५० हजार जवान; चीनला संघर्ष भारी पडणार

नवी दिल्ली: चीनच्या आडमुठेपणामुळे पूर्व लडाख सीमेवरील तणाव कायम आहे. चीनच्या कुरापतींचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज आहे. संघर्ष झाल्यास भारताचा पराभव निश्चित, आम्ही कोणताही दबाव घेणार नाही, अशी दर्पोक्ती चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानं केली. सध्याच्या घडीला सीमेवर दोन्ही बाजूंनी ५० हजार जवान तैनात आहेत. सीमेवरील तणाव निवळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे हिवाळ्यातही दोन्ही बाजूनं सैन्य तैनात असेल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा हट्ट चिनी सैनिकांना महागात पडू शकतो. यामागे अनेक कारणं आहेत.

बर्फाळ आणि उंच भागांमध्ये सरावाचा अभावहिवाळ्यात पूर्व लडाखमधील तापमान उणे ३० डिग्रीपर्यंत घसरेल. लडाखमधील भीषण थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता चिनी सैनिकांसाठी जीवघेणी ठरू शकते. चिनी सैनिकांना आताच पोटाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. याच आजारामुळे चिनी लष्कराच्या सर्वात मोठ्या पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर राहिलेल्या झांग जुडोंग यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना अवघे ६ महिनेच लडाखमधील आव्हानात्मक स्थितीचा सामना करता आला. चीननं गेल्या ९ महिन्यांत तीनदा पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर बदलले आहेत. पश्चिम थिएटर कमांडचं मुख्यालय तिबेटमध्ये आहे. या कमांडवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतची जबाबदारी आहे.

भारतीय जवान चीनवर भारी पडणारभारतीय लष्कराचे जवान उंच भागांमध्ये होणाऱ्या युद्धांत अतिशय निष्णात आणि तरबेज असल्याचं वॉशिंग्टनस्थित अमेरिकन सुरक्षा केंद्राच्या अभ्यासातून समोर आलं आहे. या बाबतीत चिनी सैनिक भारताच्या आसपासदेखील टिकत नाहीत. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं युद्धक्षेत्र अशी ओळख असलेल्या सियाचिनमध्ये भारतीय जवान पाय रोवून उभे आहेत. दुर्गम डोंगराळ भागांत भारतीय जवान युद्धाचा सराव करतात. सियाचिनमधील परिस्थिती लडाखपेक्षा कितीतरी पट अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघर्ष झाल्यास भारतीय जवान मोठी आघाडी घेऊ शकतात.

टूटू रेजिमेंटमध्ये भारताकडे आघाडीलडाखमधील अवघड भौगोलिक स्थितीत संघर्ष झाल्यास भारताच्या टूटू रेजिमेंटची स्थिती उत्तम आहे. या रेजिमेंटची फारशी माहिती कोणाकडेच नाही. या रेजिमेंटचं काम अतिशय गोपनीयरित्या चालतं. यामध्ये आधी तिबेटींचा भरणा होता. आता गोरखा जवानदेखील या रेजिमेंटचा भाग आहेत. या रेजिमेंटची स्थापना १९६२ मध्ये झाली. रेजिमेंटमध्ये स्थानिकांचं प्रमाण खूप आहे. त्यांना तिथल्या परिस्थितीची अतिशय उत्तम जाण आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणाव