शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

India China FaceOff: देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी पंतप्रधान मोदींनी राजधर्माचे पालन करावे- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 2:55 AM

India China FaceOff: पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे.

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसमवेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी राजधर्माचे पालन करावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. गलवान खोऱ्यातील तणावाबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेले निवेदन म्हणजे सत्य झाकण्याचा तोकडा प्रयत्न असल्याची टिप्पणीही केली आहे.लडाखबाबत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम पंतप्रधान व सरकारने गलवान खोºयाबाबत आपले धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे. गलवान खोरे भारताचा भाग नाही का? सरकार गलवान खोºयावरील चीनच्या दाव्याला ठोसपणे का नाकारत नाही? त्या खोºयात चिनी सैनिक असतील तर ते घुसखोर नाहीत का? पेंगकाँग त्सो भागातील चिनी घुसखोरांबाबत सरकारने मौन का बाळगले आहे? पंतप्रधानांना आमचे गांभीर्यपूर्वक आवाहन आहे की, त्यांनी राजधर्माचे पालन करावे. तसेच देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी ठोसपणे मुकाबला करावा.तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीतील निवेदनाबाबत टिष्ट्वट केले. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारतीय भाग चीनकडे सुपूर्द केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी लडाखच्या योग्य स्थितीबाबत सांगितले असेल तर मग २० जवानांचे सर्वोच्च बलिदान का झाले? मागील काही आठवड्यांपासून चीनबरोबर सैन्य स्तरावर कोणत्या विषयावर बातचीत सुरू आहे, असा सवाल केला आहे. पंतप्रधान म्हणतात की, भारतीय हद्दीत बाहेरून कोणीही आले नाही. त्यांचे हे विधान लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री व विदेश मंत्र्यांच्या यापूर्वीच्या विधानाला छेद देणारे आहे. त्यांच्या विधानाने आम्ही हतप्रभ झालो आहोत.आमच्या भूमीत बाहेरून घुसखोरी झालेली नाही तर मग पाच-सहा मे रोजी दोन्ही सेनांचे समोरासमोर येणे काय होते? ५ मे ते ६ जूनपर्यंत स्थानिक भारतीय कमांडर आपल्या चीनच्या समकक्षांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करीत होते? सहा जून रोजी दोन्ही देशांच्या कोअर कमांडर स्तरीय चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली, असा सवालही त्यांनी केला.>राजा बोला रात है, रानी बोली रात हैकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरील व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, यह सुबह सुबह की बात है.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी