शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

India China FaceOff: मोठी बातमी! गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या ७६ जवानांची प्रकृती स्थिर; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:13 PM

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशातील सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४३ सैनिकांचीही मोठी हानी झाली. भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे.

भारत आणि चीन यांच्या सैनिकात गलवान खोऱ्यात झटापट झाली. यामध्ये २० जवान शहीद झाले तर इतर ७६ जवान जखमी झाले. सुदैवाने सध्या या जखमींपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. न्यूज एजेन्सी एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारताचे १८ जवान लेहच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील १५ दिवसांत हे जवान पुन्हा ड्युटीवर कार्यरत होतील असं सांगितलं आहे.

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या ५८ जवानांना ड्युटीवर पुन्हा परतण्यास एक आठवड्याचा कालावधी जाईल अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान चीन आणि भारतातील मेजर जनरलांनी सलग तिसर्‍या दिवशी गलवान वाद सोडविण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक गुरुवारी सुमारे ६ तास चालली. गलवान व्हॅलीच्या जवळ ही बैठक झाली. यापूर्वी बुधवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही.

गलवानच्या घटनेसाठी भारताने दोन दिवसांत दुसऱ्यांदा चीनला दोष दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या मुत्सद्दी व सैन्य स्तरीय चर्चा सुरू आहे. ६ जूनला कमांडरांचा संवाद झाला. या बैठकीत सहमती झाली होती, त्याचं पालन चीनने करायला हवं होतं. १५ जूनच्या रात्री जे झालं त्यासाठी चीन जबाबदार आहे. जर त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत जे ठरलं आहे ते लक्षात ठेवलं असतं तर हे नुकसान झालं नसतं. तसेच २३ जून रोजी रशिया, चीन आणि भारत यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर सहभागी होतील असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन