India China FaceOff: Don't make statements against China; Indications from PMO | India China FaceOff: चीनविरुद्ध वक्तव्ये करू नका; ‘पीएमओ’चे संकेत

India China FaceOff: चीनविरुद्ध वक्तव्ये करू नका; ‘पीएमओ’चे संकेत

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गलवान खोरे आणि अन्य क्षेत्रातील सुरक्षा अद्याप कमी केलेली नसताना चीन विरोधी वक्तव्यांचा स्वर तीव्र असणार नाही, याचे संकेत सरकारने दिले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी यांना संकेत दिले आहेत की, लडाखमधील परिस्थिती मेपूर्वीच्या स्थितीसारखी पूर्ववत होत नाही तोपर्यंत सार्वजनिकरित्या याबाबत वक्तव्ये करु नयेत. ७ जुलै रोजी झालेल्या उभय देशातील चर्चेनंतर मंत्री अथवा अन्य पदाधिकारी यांनी याबाबत शब्दही काढलेला नाही. मोदी सरकार हे पाहत आहे की, चीनचे सैन्य कोणत्या गतीने मागे पावले टाकते? चीनचे विदेश मंत्री वांग ली यांनी ७ जुलै रोजी म्हटले होते की, आम्हाला अपेक्षा आहे की, भारत चीनसोबत योग्य दिशेने संवाद करेल. तसेच, चीनविरुद्ध वक्तव्ये थांबविले जातील. तसेच, चीनविरुद्ध उचललेले पावलेही मागे घेतली जातील.
चीन वस्तूंवरील बहिष्काराचा मुद्दाही शांत झाला आहे. असे समजते की, ज्या ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे त्यातील काही प्रवर्तकांबरोबर पूर्ववत स्थिती करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला जात आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India China FaceOff: Don't make statements against China; Indications from PMO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.