शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: चीनकडून पुन्हा भारताचा विश्वासघात?; सॅटेलाईट फोटोंनी टिपला ड्रॅगनचा कावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 15:13 IST

India China Faceoff: भारत-चीनचं सैन्य आमनेसामने आलेल्या गलवानमध्ये ड्रॅगनच्या वेगवान हालचाली

बीजिंग: गेल्या आठवड्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्याची झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ३५ ते ४० जवान मारले गेले. मात्र चीननं मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचा नेमका आकडा जाहीर केलेला नाही. यानंतर परवा (२२ जून) भारत आणि चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यानंतर चीननं सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे सीमेवरील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र प्रत्यक्षात चीनच्या वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून चीनचा कावेबाजपणा उघड झाला आहे.गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या हालचाली उपग्रहांनी टिपल्या आहेत. त्यामधून चीनच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज येऊ लागला आहे. ओपन सोर्स इंटेलिजन्स ऍनालिस्ट डेट्रेस्फानं गलवान खोऱ्यातील काही छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. गेल्या आठवड्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झालेल्या ठिकाणाजवळ सध्या बंकर तयार करण्याचं काम सुरू असल्याचं छायाचित्रांमधून दिसत आहे. या भागात लहान लहान भिंती तयार करण्यात आल्या असून खोदकामही करण्यात आलं आहे. त्यामुळे चीनचा नेमका मानस काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतासोबत संवाद सुरू ठेवून गलवानमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत. डेट्रेस्फानं दिलेल्या माहितीनुसार चिनी सैन्यानं पँगाँग तलाव परिसरातही तळ ठोकला आहे. या भागातील चिनी सैन्याची संख्या वाढत जात आहे. पँगाँगच्या दक्षिणेला १९ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात चिनी सैन्य उपस्थित आहे. भारतासोबत निर्माण झालेला सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे. परवा झालेल्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतही चीननं याचाच पुनरुच्चार केला. त्यांनी पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याचीही तयारी दर्शवली.५ मेपासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी ५ जूनला दोन्ही देशांच्या लष्कराच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये पहिल्यांदा बैठक झाली. या बैठकीतही चीननं पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र बैठकीतल्या निर्णयांची अंमलबजावणी होतेय की नाही, ते पाहण्यासाठी गेलेल्या भारतीय जवानांवर चिनी सैन्यानं हल्ला केला. त्याला भारतीय जवानांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. मात्र चीननं मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही.मोदी सरकार चीनला मोठा धक्का देणार?; ११७२ वस्तूंची नवी यादी तयारचीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीतीनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचालीजुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख