India China Face Off: "चीनवर मर्यादित सैन्य कारवाई करायला हवी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:40 IST2020-06-20T05:51:53+5:302020-06-20T06:40:56+5:30
चीन हा पाकिस्तान नाही हे जरी खरे असले तरी चीनच्या सैन्य ताकदीपुढे भारतही तेवढाच सक्षम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

India China Face Off: "चीनवर मर्यादित सैन्य कारवाई करायला हवी"
नवी दिल्ली : चीनला योग्य संदेश देण्यासाठी मर्यादित सैन्य कारवाई करायला हवी, असे मत संरक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. चीन हा पाकिस्तान नाही हे जरी खरे असले तरी चीनच्या सैन्य ताकदीपुढे भारतही तेवढाच सक्षम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चीनकडे २२ लाख सैन्य आहे. तर, भारताकडे १५ लाख. चीनच्या क्षेपणास्त्राची क्षमता ११,२०० किमीपर्यंत मारा करण्याची आहे. भारताच्या अग्नी ३ क्षेपणास्त्राची क्षमता ३ हजार किमीची आहे. अग्नी ५ ची क्षमता ५ हजार किमीची आहे. चीनकडे ३२० अण्वस्त्र आहेत. भारताकडे १५० अण्वस्त्रे आहेत. भारताची परिस्थिती आता १९६२ सारखी राहिलेली नाही. चीनशी दोन हात करण्यासाठी भारताचे सैन्यबळ सक्षम असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.