शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 09:54 IST

ज्या ठिकानांसंदर्भात दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा ठिकानांवरून चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे.

ठळक मुद्देचिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे.फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्‍स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे.LAC फिंगर 9वर उत्‍तरेपासून दक्षिणेकडे जाते.

नवी दिल्‍ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्‍ट्रक्‍चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्‍स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्‍ससंदर्भात भारत-चीनदरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.

PHOTO : 'या'च भागत तब्बल 8 किमी आत घुसला चीन; ...म्हणून 'आमने-सामने' आलंय लष्कर

'गलवानमध्ये धैर्याने उभे आहेत भारतीय जवान' -आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. "गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही."

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

पेंगाँग सरोवराचा प्रश्न गंभीर -पेंगाँग त्सोच्या उत्‍तरेकडील काठावर भारत आणि चीनदरम्यान जी झटापट झाली ती अत्यंत गंभीर आहे. जवळपास 13,900 फूट उंचावर चांगलाजवळ 5-6 मेरोजी दोन्हीकडचे जवान एकमेकांच्या समोर आले होते. तेव्हापासून चीनी सैनिक भारतीय जवानांना फिंगर 4च्या पूर्वेकडे जाण्यापासून रोखत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "भारतीय लष्कराचे सर्व नकाशे स्पष्ट करतात, की LAC फिंगर 9वर उत्‍तरेपासून दक्षिणेकडे जाते. फिंगर 3 आणि 4 दरम्यान अनेक वर्षांपासून आयटीबीपीची पोस्ट आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून तेथील फिंगर 4 आणि 8दरम्यान चीनने जो कब्जा केला आहे, त्यावर चर्चा करण्यास PLA नकार देत आहे."

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

अशी आहे भारताची मागणी -ज्या ठिकानांसंदर्भात दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा ठिकानांवरून चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे. यासाठी चीनला पेंगाँग त्सोमधील आपले अनेक स्‍ट्रक्‍चर्स आणि बंकर्स नष्ट करावे लागतील. याला वेळ लागू शकतो.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनSoldierसैनिकIndiaभारतIndian Armyभारतीय जवानladakhलडाख