शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'सर्व जगाला सांगता, पण संसदेला नाही', ऑपरेशन सिंदूरबाबत 16 विरोधी पक्षांचे PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:26 IST

INDIA Bloc Meeting: ऑपरेशन सिंदूरबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

INDIA Bloc Meeting: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूरद्वारे पाकस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. सरकारच्या या कारवाईबाबत देशभरातून कौतुक होत आहे. मात्र, या ऑपरेशनबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (3 जून) दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये I.N.D.I.A आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. 

जयराम रमेश, संजय राऊत, राम गोपाल यादव, मनोज झा, डेरेक ओ'ब्रायन हे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पोहोचले होते. या बैठकीनंतर 16 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या पत्रात पहलगाम, पूंछ, उरी, राजौरी येथील दहशतवादी हल्ले आणि भारत-पाक संघर्ष यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर संसदेत मुक्त चर्चेबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

'संसद जनतेला जबाबदार आहे'तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, "16 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. सरकार संसदेला जबाबदार आहे आणि संसद जनतेला जबाबदार आहे. सर्व विरोधकांना वाटते की, केंद्र सरकारने केवळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर विधाने करू नयेत, तर संसदेतदेखील संवाद साधावा."

'लष्कराचे आभार माना आणि रणनीतीवर चर्चा करा'काँग्रेसचे खासदार दीपेंदर सिंह हुडा म्हणाले की, "कठीण काळात विरोधी पक्षांनी लष्कर आणि सरकारला पूर्ण पाठिंबा दिला. जेव्हा अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केली, तेव्हा आम्हाला वाटले की, लष्कराचे आभार मानण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. दहशतवादाविरुद्धच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करणेही आवश्यक आहे."

'सरकार संसदेला का टाळत आहे?'समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, "तुम्ही संपूर्ण जगाला माहिती देत ​​आहात, पण संसदेला नाही. आम्ही राजनैतिक पातळीवर पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. ट्रम्प यांनी युद्धविराम घोषित केला, सरकार यावर गप्प आहे. हा मुद्दा संसदेत चर्चेला पात्र आहे."

'लोकशाहीत संसदेपेक्षा मोठे व्यासपीठ असते का?'शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रश्न विचारले. ते म्हणाले, "जर ट्रम्पसाठी युद्धविराम होऊ शकतो, तर विरोधकांच्या इशाऱ्यावर संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले जाऊ नये? यासाठीही आपल्याला ट्रम्पकडे जावे लागेल का? जर सरकार खरोखरच लोकशाहीवर विश्वास ठेवत असेल, तर त्यांनी संसदेत येऊन चर्चा करावी."

या पक्षांनी केली अधिवेशन बोलावण्याची मागणी पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, शिवसेना (उद्धव गट), राजद, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, जेएमएम, व्हीसीके, केरळ काँग्रेस, एमडीएमके आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी