पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:04 IST2025-08-08T13:02:38+5:302025-08-08T13:04:01+5:30
India-America: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंत्रिमंडळ बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीबाबत चर्चा करतील.

पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
India-America: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लावलेल्या ५० टक्के अतिरिक्त शुल्काच्या निर्णयानंतर दोन्ही देशांमधील व्यापार संबंध तणावाच्या स्थितीत आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेच्या कारवाईला भारताच्या धोरणात्मक प्रतिसादावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
ट्रम्प यांची घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय वस्तुंवर २५ टक्के कर लावला होता. तसेच, रशियाकडून तेली खरेदी न करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, भारताने अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतीय मालावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला. अशाप्रकारे अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के कर लादला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय अन्याय्य आणि अविचारी असल्याचे म्हटले आहे.
नवीन शुल्क लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
तसेच, गुरुवारी दिल्ली येथे एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलतानाही पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही. मला माहित आहे की, यासाठी मला वैयक्तिकरित्या खूप मोठी किंमत मोजावी लागेल, परंतु मी तयार आहे, असे पीएम मोदी म्हणाले.