शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

"भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता, ते थांबवण्यासाठीच..."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर परराष्ट्र सचिवांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:24 IST

India Air Strike on Pakistan: भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ६ मे च्या रात्री सशस्त्र दलांनी ही कारवाई केली. या कारवाईत, भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली.

ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेपूर्वी, भारतावर आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या.भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी सांगितले की पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता. जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. जातीय दंगली भडकवण्याचाही प्रयत्न झाला. पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत, असं विक्रम मिस्री म्हणाले.

"जगभरातील दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान अजूनही एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. यामुळे दहशतवाद्यांना शिक्षेपासून वाचण्यास मदत होते. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःला टीआरएफ म्हणवणाऱ्या एका गटाने स्वीकारली. हा गट संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नव्हता. म्हणूनच, भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने स्वीकारली. हा गट लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. आज पाकिस्तान आणि पीओकेमध्ये केलेली लष्करी कारवाई अत्यंत मोजमापाची, जबाबदार आणि चिथावणीखोर नव्हती," असेही परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

"या निंदनीय दहशतवादी कृत्याला जबाबदार धरण्याची गरज असल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांनीही केले आहे. २५ एप्रिल रोजीच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटमधून टीआरएफचा संदर्भ काढून टाकण्यासाठी पाकिस्तानचा दबाव देखील लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध उघड झाले आहेत," असे विक्रम मिस्री यांनी म्हटलं.

"हल्ल्याला पंधरा दिवस उलटूनही, पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दहशतवादी तळांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्याऐवजी, ते फक्त नकार देण्यात आणि आरोप करण्यात गुंतलेले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूल्सवरील आमच्या गुप्तचर देखरेखीवरून असे दिसून आले की भारतावर आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे. म्हणून, ते आधीच थांबवण्याची आणि रोखण्याची गरज होती. आज सकाळी, भारताने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरला," असेही विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक