शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
3
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
4
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
5
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
6
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
7
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
8
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
9
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
10
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
11
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
12
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
13
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
14
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
15
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
16
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
17
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
18
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
19
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
20
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI

'INDI आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश', PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 21:59 IST

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

Anurag Thakur Speech : माजी केंद्रीय मंत्री आणि हमीरपूरचे भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur ) यांनी मंगळवारी(दि.30) लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाषणादरम्यान ठाकूर यांनी नाव न घेता राहुल गांधींकडे बोट दाखवत 'ज्याला स्वतःची जात माहित नाही, तो जात जनगणनेबद्दल बोलतो' असे म्हटले. यावर विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. मात्र, अनुराग ठाकूर यांना भाजप नेत्यांकडून भक्कम पाठिंबा मिळाला. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील त्यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सायंकाळी अनुराग ठाकूर यांचे लोकसभेतील भाषण मायक्रोब्लॉगिंग साइट X वर पोस्ट केले. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझा तरुण आणि उत्साही सहकारी अनुराग ठाकूर यांचे भाषण ऐकायलाच हवे. त्यांनी इंडी आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश करुन अतिशय चपखलपणे वस्तुस्थिती मांडली आहे."

राहुल यांच्या प्रत्येक आरोपाला अनुराग यांचे प्रत्युत्तरअनुराग ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांच्या 'चक्रव्यूह'वाल्या टीकेवर जोरदार प्रहार केला आणि काँग्रेससह गांधी कुटुंबाचे वर्णन चक्रव्यूह असे केले.अनुराग ठाकूर म्हणतात, 'अभिमन्यूची हत्या सहा नाही, तर सात महारथींनी केली होती. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि महाभारताचे त्यांचे ज्ञानही अपघाती आहे. अभिमन्यूला जयद्रथ, दुर्योधन, दुशासन, कर्ण, कप्रिचार्य, शकुनी आणि द्रोणाचार्य, या सात योद्ध्यांनी मारले होते. हे त्या नेत्याशिवाय इतर सर्वांना माहीत आहे. राहुल गांधींनी महाभारत वाचले किंवा पाहिले आहे की नाही, हे कुणालाही माहीत नाही.

राजीव गांधी फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती SC,ST,OBC? सीतारमन यांचं वर्मावर बोट!

शशी थरूर यांच्या पुस्तकाचा उल्लेख “मी महाभारतावरील एक नवीन पुस्तक वाचले. ते पुस्तक त्यांच्याच पक्षाचे खासदार (शशी थरूर) यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन नोबेल'. राहुल गांधी यांना महाभारत आणि चक्रव्यूहची संपूर्ण माहिती हवी असेल, तर ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. या कादंबरीत कोणत्या नेत्याला धृतराष्ट्र म्हटले आहे? कोणत्या पक्षाला कौरव म्हटले आहे? आणि कोण दुर्योधन आहे? हे राहुल गांधींना समजल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. हे लोक केवळ पुस्तके दाखवतात, पण वाचत नाहीत. ते संविधान दाखवत होते, मी विचारलं किती पानं आहेत, तेही सांगता आले नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांचा दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीAnurag Thakurअनुराग ठाकुरUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Parliamentसंसद