शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : हवाई दलाच्या वेशामध्ये दहशतवादी फिरतोय, दिल्लीमध्ये हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 11:02 IST

40 हजार पोलिसांसह निमलष्करी दलाच्या 35 तुकड्या सुरक्षेसाठी तैनात

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिवस उद्यावर आला असताना राजधानी नवी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाच्या जवानाच्या वेशामध्ये एक संशयित दहशतवादी फिरत असल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे. रविवारी सायंकाळी एक व्यक्ती राजीव चौक मेट्रो स्टेशनजवळ संशयास्पदरित्या फिरताना दिसला होता. यानंतर त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनावेळी दिल्लीसह देशभरात घातपात घडविण्यासाठी जैश-ए- मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे दहशतवादी घुसल्याचे वृत्त काही दिवसांपुर्वीच सुरक्षा यंत्रणांनी दिले होते. यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. रविवारी सायंकाळी एअर फोर्सच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने या संशयित व्यक्तीला हवाई दलाच्या वेशामध्ये पाहिले होते. मात्र, या संशयिताने गणवेशासोबत स्पोर्ट शुज घातले होते.  निवृत्त अधिकाऱ्याला ही बाब खटकली. कारण भारतीय सेनांचे अधिकारी कधीही सरकारी गणवेशावर स्पोर्ट शुज घालत नाहीत. त्यांनी विनाविलंब पोलिसांना याची खबर दिली. मात्र, तोपर्यंत संशयित व्यक्ती तेथून निसटला होता.

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार जैश-ए- मोहम्मद चे दहशतवादी प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियनच्या वेशामध्ये येण्याची शक्यता आहे. यानुसार लाल किल्ल्याजवळील सर्व पाईपलाईन आणि इलेक्ट्रीक मिटररांची तपासणी केली जात आहे. 

 याचबरोबर पोलिसांनी पतंग पकडणाऱ्यांचीही सोय केली आहे. गेल्या वर्षी ध्वजारोहनावेळी पंतप्रधान मोदी यांच्या जवळ एक पतंग पडला होता. तसेच आजुबाजुच्या लोकांना 15 ऑगस्टला पतंग न उडविण्याबाबत सांगण्यात आले आहे. परिसरात 1000 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच 40 हजार पोलिसांसह निमलष्करी दलाच्या 35 तुकड्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसdelhiदिल्लीterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद