Independence Day 2020: congress digambar kamat urges pm modi to ban tricolor pattern face mask | Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

पणजी – १५ ऑगस्ट रोजी भारत ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. कोविड १९ च्या संकटामुळे सध्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारात गर्दी कमी असली तर देशवासियांच्या मनात उत्साह कायम आहे. स्वातंत्र्य दिनावेळी लोक छोट्या रंगाचे तिरंगा बॅच, तिरंगा असणाऱ्या वस्तू विकत घेताना दिसतात. मात्र कोरोनामुळे सध्या मार्केटमध्ये तिरंगा मास्कची प्रचंड विक्री सुरु आहे.

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या थीमने सुशोभित केलेले हे तिरंगा मुखवटे बनवण्यासाठी त्यावर देशभक्ती दर्शविणार्‍या वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजे काही मास्कवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा लिहून दिल्या आहेत आणि या बरोबरच भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक सारख्या देशभक्तांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे बनविली गेली आहेत.

मात्र गोव्यातील काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिरंगा मास्कवर बंदी घालण्याचे आवाहन केले. खरं तर, आजकाल बऱ्याच प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत, स्वातंत्र्य दिन लक्षात घेऊन बाजारात तिरंगा मास्कदेखील विकले जात आहेत. हे मास्क भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या तीन रंगांनी मध्यभागी अशोक चक्र अशाप्रकारे बनवले आहेत. या मास्कवर कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला आहे.

दिगंबर कामत यांनी पीएमओला टॅग करत एक ट्विट केले त्यात म्हटलं आहे की, सर्व राज्यात अशा मास्कवर बंदी घालण्यात यावी, हा फोटो पाहून मला फार वाईट वाटतं. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना सूचना द्याव्यात आणि तिरंगा व अशोक चक्रांवरील मास्कवर बंदी घालावी अशी विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. जय हिंद. वंदे मातरम्. भारत माता की जय असं म्हटलं आहे.

झारखंडमध्ये 'तिरंगा मास्क' विक्रीवर बंदी

यापूर्वी झारखंडच्या रांची जिल्हा प्रशासनाने तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घातली आहे. कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिन्हा यांनी तिरंगा मास्क विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, कोणी बंदी असूनही तिरंगा मास्क विकल्यास त्याविरूद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अखिलेश सिन्हा यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओ / सीओ, पोलिस प्रभारी आणि प्रतिनियुक्त दंडाधिकाऱ्यांना तिरंगा मास्क विक्री थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Independence Day 2020: congress digambar kamat urges pm modi to ban tricolor pattern face mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.