महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:08 IST2026-04-12T09:07:34+5:302026-04-12T09:08:52+5:30
Assembly Election 2026: आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विद्यमान निवडणुकांमध्ये महिला मतदार केवळ सहभागीच झाल्या नाहीत, तर निकालाची दिशा ठरवणारी एक प्रमुख शक्ती बनल्या आहेत. अनेक जागांवर महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक असल्याने राजकीय पक्षांची समीकरणे बदलली आहेत.

महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
नवी दिल्ली - आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विद्यमान निवडणुकांमध्ये महिला मतदार केवळ सहभागीच झाल्या नाहीत, तर निकालाची दिशा ठरवणारी एक प्रमुख शक्ती बनल्या आहेत. अनेक जागांवर महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक असल्याने राजकीय पक्षांची समीकरणे बदलली आहेत.
कल्याणकारी योजनांची भूमिका
महिलांच्या या सक्रिय सहभागामागे सरकारांच्या कल्याणकारी योजनांची मोठी भूमिका आहे. ज्या राज्यांमध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबवल्या गेल्या, तिथे महिला मतदारांचा सत्ताधारी पक्षाकडे कल वाढल्याचे दिसते. याशिवाय महिलांचे मतदान आता पारंपरिक जात-धर्माच्या पलीकडे जाऊन महागाई, आरोग्य, मुलांचे शिक्षण, रोजगार आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर केंद्रित झाले आहे.
न बोलताही महिला बदलणार सत्तेची समीकरणे
निवडणूक निकालांच्या कलानुसार, महिला मतदार आता ‘सायलेंट स्विंग फॅक्टर’ बनल्या आहेत. त्या कोणत्याही एका पक्षाच्या कायमस्वरूपी व्होट बँक राहिलेल्या नाहीत. उलट, सरकारची कामगिरी, प्रशासनावरील विश्वास आणि आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम या आधारावर महिला स्वतंत्रपणे निर्णय घेताना दिसत आहेत. या राज्यांमध्ये महिलांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही धाबे दणाणले आहेत.
मतदानात महिलांनी मारली बाजी
आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या तिन्ही राज्यांमध्ये महिलांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक उत्साहाने मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे.