उन्हाचा दाह वाढतोय.... ( जोड आहे)

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:20+5:302015-02-18T00:13:20+5:30

लिंबू सरबत, बर्फाचा गोळा गाड्यांवर गर्दी

Increasing the inflammation of the sun ... (attachment) | उन्हाचा दाह वाढतोय.... ( जोड आहे)

उन्हाचा दाह वाढतोय.... ( जोड आहे)

ंबू सरबत, बर्फाचा गोळा गाड्यांवर गर्दी

औरंगाबाद, दि.१७ - फेब्रुवारी महिन्यातच एवढे ऊन पडत आहे, तर मेमध्ये काय होईल? बापरे... विचार केला तरी भोवळ यायची वेळ. अशी उन्हाचा पारा वाढल्याची वाक्ये सहज ऐकायला मिळत आहेत. घराच्या कानाकोपर्‍यात पडलेल्या उन्हाळ्याच्या टोप्या, स्कार्फ, सनकोट आता बाहेर आले आहेत. धुळीसोबतच आता उन्हाची भर पडल्याने दुचाकीवरून जाताना उन्हाळ्याचे कपडे घालून बाहेर पडणे सर्वांसाठी अनिवार्य झाले आहे. रसवंत्या, बर्फाच्या गोळ्याच्या गाड्या, लिंबू सरबत यांच्या साहाय्याने उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांकडून केला जात आहे.

शीतपेये, सनग्लासेसची दुकाने सज्ज
उन्हाळा म्हटला की, अनेकांना उसाचा रस प्यायला फार आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे भोवळ येणे, उलट्या होणे, बेशुद्ध होणे अशा प्रकारांना बळी पडावे लागते. त्यामुळे नागरिक जास्तीत जास्त पाणी पीत असून त्यासोबतच लिंबू सरबत, उसाचा रस ही शीतपेये मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत शीतपेयांचे प्राशन जास्त केले जात असल्याने त्याच प्रमाणात दुकानेदेखील सज्ज झालेली आहेत. थोडा वेळ विश्रांती घेऊन शीतपेयांचा आस्वाद घेणे पसंत केले जात आहे. उन्हापासून डोळ्याचा बचाव करण्यासाठी सनग्लासेस खरेदी करण्यासाठी युवा वर्ग गर्दी करीत आहे. डोळे हे अतिशय नाजूक असल्याने ब्रँडेड गॉगल्स वापरण्याकडे त्यांचा कल आहे.

घशाला कोरड
जसजसा उन्हाचा पारा वाढू लागला आहे, तसा पाणी पिण्यासाठी अक्षरश: जीव बेचैन होत आहे. पाण्याचा एक घोटही मिळाला तरी फार हायसे वाटते. घरातून बाहेर पडणारी व्यक्ती स्वत:जवळ पाण्याची बॉटल ठेवत आहे. त्याचबरोबर जेवणातही शरीरासाठी आल्हाददायक आणि थंड वाटणार्‍या पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे. पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे घरोघरी टँकर्सची मागणी वाढत आहे. रस्त्यावर झाडाखाली थांबून थोडावेळ विश्रांती घेणे पसंत करीत आहेत.

Web Title: Increasing the inflammation of the sun ... (attachment)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.