शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
4
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
5
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
6
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
7
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
8
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
9
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
11
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
12
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
13
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
14
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
15
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
16
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
17
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
18
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
19
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
20
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट

रेल्वेद्वारे कोळशाचा पुरवठा वाढवा; वीज कंपनीची कोल इंडियाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:13 IST

दररोज ४५ रॅकची मागणी असताना कोरबा भाग दररोज केवळ २५ रॅक भरू शकत आहे. रेल्वेमार्फत पुरवठा कमी झाल्याने त्यांना ट्रकद्वारे कोळसा मागवण्याचा महागडा मार्ग निवडावा लागत आहे.

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या कोरबा भागात रेल्वेद्वारे कोळशाचा पुरवठा वाढवा, असे वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कोल इंडियाला सांगितले आहे. या कंपन्यांचे म्हणणे आहे की, यामुळे कोळशाच्या वाहतुकीचा खर्च कमी होईल व लोकांना वीज आणखी कमी दरावर मिळू शकेल.

असोसिएशन ऑफ पॉवर प्रोड्युसर्सने दिलेल्या माहितीनुसार, कोरबा भागाची देशांतर्गत कोळसापुरवठ्यात २० टक्के भागीदारी आहे; परंतु कोल इंडियाची सहकारी साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड या भागातून केवळ ५५ टक्केच पुरवठा रेल्वेद्वारे करीत आहे.असोसिएशनने कोल इंडियाचे प्रमुख अनिल कुमार झा यांना एक पत्र लिहून सांगितले आहे की, रेल्वेऐवजी रस्त्याच्या मार्गाने कोळशाचा पुरवठा करण्याने वीज कंपन्यांना २५ टक्के जादा दराचा फटका बसत आहे.

असोसिएशनने म्हटले आहे की, दररोज ४५ रॅकची मागणी असताना कोरबा भाग दररोज केवळ २५ रॅक भरू शकत आहे. रेल्वेमार्फत पुरवठा कमी झाल्याने त्यांना ट्रकद्वारे कोळसा मागवण्याचा महागडा मार्ग निवडावा लागत आहे. रेल्वेच्या एका रॅकमध्ये ४,००० टन कोळशाची वाहतूक शक्य आहे. याचा अर्थ प्रति रॅकच्या भरपाईसाठी ३० टन वाहतुकीची क्षमता असलेल्या १३५ ट्रकची गरज आहे.असोसिएशनने म्हटले आहे की, कोळसा वाहतुकीचा अधिकचा खर्च अखेर सर्वसामान्य ग्राहकांच्याच माथी पडत आहे. असोसिएशनने हे पत्र एचपीसीएलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक ए. पी. पांडा व रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोदकुमार यादव यांना पाठवले आहे.

कोल इंडियाचे उत्पादन मेमध्ये घटलेसार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोल इंडिया लिमिटेडचे उत्पादन यावर्षीच्या मे महिन्यामध्ये १.१ टक्क्याने घटले असून, ते आता ४६५.९० लाख टनांपर्यंत खाली उतरले आहे. कंपनीने शेअर बाजारात रविवारी सांगितले की, मागील वर्षी मे महिन्यात कंपनीचे उत्पादन ४७१.२० लाख टन होते. या महिन्यात कंपनीच्या कोळशाचा उठाव १.४ टक्क्याने घटून ५२०.९० लाख टनांवर आला होता. मागील वर्षी मे महिन्यात हा उठाव ५२८.१० लाख टन होता.

टॅग्स :railwayरेल्वे