आता याला काय म्हणावं? रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला ३७ लाखांची इन्कम टॅक्सची नोटीस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:46 IST2022-08-22T11:45:23+5:302022-08-22T11:46:07+5:30
दरराेज जेमतेम ५०० रुपये कमविणाऱ्या एका मजुराला आयकर विभागाने तब्बल ३७ लाख रुपयांच्या कर थकीत असल्याची नाेटीस मिळाली आहे.

आता याला काय म्हणावं? रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला ३७ लाखांची इन्कम टॅक्सची नोटीस!
पाटणा : दरराेज जेमतेम ५०० रुपये कमविणाऱ्या एका मजुराला आयकर विभागाने तब्बल ३७ लाख रुपयांच्या कर थकीत असल्याची नाेटीस मिळाली आहे. बिहारच्या खगडियामध्ये हा प्रकार घडला असून संबंधित मजूर आणि त्याच्या कुटुंबीयांना माेठा धक्का बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिरीश यादव या मजुराला आयकर विभागाची नाेटीस मिळाली आहे. त्यानुसार यादव त्याच्यावर ३७.५० लाख रुपयांची आयकर थकबाकी आहे. ताे त्याने तातडीने भरावा, असे नाेटिशीत म्हटले आहे. नाेटिशीनुसार यादव याच्या नावावर राजस्थानातील पाली येथे एका कंपनीची नाेंद आहे. यादव याच्या पॅन क्रमांकाशी संबंधित व्यवहारावरून ही नाेटीस पाठविण्यात आली आहे.
यादवने दिल्लीत एकदा एका दलालाच्या माध्यमातून पॅन कार्ड बनविण्याचा प्रयत्न केला हाेता. ताे त्याला नंतर कधीच भेटला नाही. त्यानेच यादवची फसवणूक केल्याचा पाेलिसांना संशय आहे.
फसवणुकीचा प्रकार असल्याचा संशय
गिरीश यादवला नाेटीस पाहून माेठा धक्का बसला आहे. ताे राेजंदारीवर काम करून दरराेज जेमतेम ५०० रुपये कमावताे. मी कधीही राजस्थानला गेलेलाे नाही, असे ताे म्हणाला. त्याने याप्रकरणी पाेलिसांकडे धाव घेतली आहे.