शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

आयकर विभागाचा शशिकलांना धक्का; जया टीव्हीसह विविध मालमत्तांवर छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 8:17 AM

गुरूवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नईतील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे.

ठळक मुद्दे गुरूवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नईतील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या दहा अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी सहा वाजता एक्काथुथंगल येथील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली.

चेन्नई- गुरूवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नईतील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या दहा अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी सहा वाजता इक्कटथुथंग येथील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली. तसंच आयकर विभागाने डॉक्टर नामधू एमजीआरच्या (तामिळ वृत्तपत्र) ऑफिसवरही छापेमारी केली आहे. शशिकला यांच्या कुटुंबीयांशी संबंधीत काही जागा, समर्थक त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री जजललिता यांच्या कोदांद इस्टेटसह राज्यभरात 80 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. ही छापेमारी देशव्यापी असून एकुण 187 ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी छापे मारत आहेत. 

कर न भरल्याची माहिती मिळाल्याने जया टीव्हीच्या कार्यालयासह इतर ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘करचोरी करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने छापे टाकण्यात आले असून वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ऑपरेशन क्लीन मनीच्या अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये ८० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

बोगस कंपन्या, संशयित गुंतवणूक यांच्याबद्दलचा तपास करण्यासाठी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. या प्रकरणावर भाष्य करताना, ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप जया टीव्हीच्या वकिलांनी केला. ‘केंद्र सरकारकडून जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. सरकारच्या या कारवाईने आम्ही घाबरणार नाही. आम्ही कायदेशीर संघर्ष करु,’ अशी प्रतिक्रिया जया टीव्हीच्या वकिलांनी दिली.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी जया टीव्ही सुरू केलं. या टीव्ही चॅनेलचं नियंत्रण सध्या तुरूंगात असणाऱ्या एआयएडीएकेच्या नेत्या शशिकला यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे आहेत. या टीव्हीचं नेतृत्व शशिकला यांचा पुतण्या विवेक जयरामण करतात. 

जया टीव्हीच्या ऑफिसवरील छापेमारीनंतर आयकर विभागाने शशिकला यांचा पुतण्या विवेक जयरामण यांच्या घरावर आणि जाज सिनेमासमध्येही सर्च ऑपरेशन केलं. जाज सिनेमास शशिकला यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचं आहे.