The income tax department raids the house of the most expensive actress | सर्वात महागड्या अभिनेत्रीच्या घरावर आयकर विभागाचा छापा  

सर्वात महागड्या अभिनेत्रीच्या घरावर आयकर विभागाचा छापा  

ठळक मुद्देअद्याप अभिनेत्री रश्मिका आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान समोर आलेलं नाही.बंगळुरू येथील आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मंदानाच्या घरी पोहोचले होते.


मुंबई- दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनाने अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. दक्षिणेतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून रश्मिका ओळखली जाते. ती कर्नाटकमधील कोडुगु जिल्ह्यातील विराजपेट येथे राहते. याच ठिकाणी असलेल्या तिच्या घरावर आयकर विभागीत अधिकाऱ्यांनी छापा टाकला. अद्याप अभिनेत्री रश्मिका आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान समोर आलेलं नाही.


मंदानाच्या घरी गुरुवारी हा छापा टाकण्यात आला अशी माहिती एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केली. बंगळुरू येथील आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मंदानाच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी मंदाना घरी होती की नव्हती याची माहिती मिळू शकलेली नाही. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली सर्वात महागडी अभिनेत्री असल्याचं बोललं जात होतं. तिने अनेक सुपरस्टारसोबत काम केलं आहे. जेव्हा रश्मिकाला तिच्या मानधनाबद्दल विचारले गेले तेव्हा तिने यात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं. ती म्हणाली की, 'मी तर आता सिनेमांत आले आहे. मी नवखी असून मी सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री नाही.

Web Title: The income tax department raids the house of the most expensive actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.