शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मोदी सरकारचा मोठा निर्णय; साखर निर्यातीतून आलेले उत्पन्न थेट 5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 16:01 IST

PM Narendra Modi Government cabinet meeting: केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर, रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. साखरेचे दर कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने दोन्ही संकटात आहेत. यावर मात करण्यासाठी 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले. 

एकीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकरी जरी रस्त्यावर उतरलेले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मिळणारे उत्पन्न, सबसिडी थेट ५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर, रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. 

यंदा सरकारने ६० लाख टन साखरेच्या निर्यातीवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. यामध्ये ३५०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच यातून मिळणारे १८००० कोटींचे उत्पन्न देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहेत, असे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. 

यंदा देशात 310 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशाला 260 लाख टन साखर लागते. साखरेचे दर कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने दोन्ही संकटात आहेत. यावर मात करण्यासाठी 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले. 

कृषी कायद्यांवरून शेतकरी विरोधात केंद्र सरकार असे वातावरण असताना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर शेतकरी असलेल्या साखर उद्योगावर निर्णय घेतला आहे. तसेच दुसरीकडे आंदोलक शेतकऱ्यांना समजावण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पूर्वोत्तर भागात वीजेची सोय करण्यासाठी तसेच सुधारण्यासाठी नवीन बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. यावर ५००० कोटी खर्च होणार होते. आता ६७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याद्वारे ट्रान्समिशन लाईन वाढविण्यात येणार आहेत. तसेच २४ तास विजेचे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे, असेही जावडेकर म्हणाले. 

स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी

केंद्र सरकारने 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz आणि 2500 MHz फ्रिक्वेन्सी बँडच्या लिलावाला २० वर्षांची परवानगी दिली आहे.  एकूण 2251.25 MHz बँडचा लिलाव केला जाणार आहे. यातून केंद्राला 3,92,332.70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी