शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

कोरोना संपल्यानंतर सीएएची अंमलबजावणी; अमित शाह यांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 9:15 AM

पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसची जुलमी राजवट मुळापासून उपटून टाकून लोकशाहीची पुनर्स्थापना केली जाईपर्यंत भाजप विश्रांती घेणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. 

सिलिगुडी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसची जुलमी राजवट मुळापासून उपटून टाकून लोकशाहीची पुनर्स्थापना केली जाईपर्यंत भाजप विश्रांती घेणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. गुरुवारी येथे जाहीर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, भाजपचा लढा हा खंडणी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचाराविरोधात सतत सुरूच राहील. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबद्दल (सीएए) तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत असून, एकदा का कोविड-१९ महामारी संपली की, सीएएची अंमलबजावणी केली जाईल. शाह हे पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्याशिवाय घुसखोरी आणि तस्करीला थांबविणे कठीण आहे, असे शाह कोलकात्यात म्हणाले. लवकरच अशी राजकीय परिस्थिती निर्माण होईल, की स्थानिक अधिकाऱ्यांना राजकीय दबाबामुळे मदतीचा हात पुढे करणे भाग पडेल, असे सांगून शाह म्हणाले, “सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमा या अभेद्य राहतील, असे बघावे. सीमांचे संरक्षण करणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्याशिवाय घुसखोरी आणि तस्करी थांबविणे कठीण आहे.”

तीन आठवड्यांत ७ राज्यांचा दौरा

  • अमित शाह हे येत्या तीन आठवड्यांत सात राज्यांचा (आसाम, तेलंगणा, केरळ, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात) दौरा करणार आहेत. 
  • हा दौरा त्यांच्या देशव्यापी दौऱ्यांचा भाग आहे. या दौऱ्यात ते सार्वजनिक, राजकीय आणि सरकारी कार्यक्रमांना उपस्थित राहतील, असे गुरुवारी अधिकाऱ्याने म्हटले.
टॅग्स :Amit Shahअमित शाहMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल