शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अवघ्या 1 फूट जमिनीसाठी लहान भावाची केली हत्या, आरोपीला घातल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:22 IST

Gorakhpur Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला गोरखपूर पोलिसांनीअटक केली. हत्या करण्यात वापरलेली काठीही मारेकऱ्याच्या भावाकडून जप्त करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे केवळ एक फूट जमिनीसाठी मोठ्या भावाने लहान भावाला काठीने बेदम मारहाण केली होती. घटनेनंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, शहापूर पोलिसांनी मारेकरी भावाला अटक केली आहे.

दरम्यान, हे प्रकरण शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवटहिया टोला येथील आहे. स्थानिक एसपी सिटी कृष्ण कुमार विश्नोई यांनी पत्रकार परिषदेतून घटनेची माहिती दिली. एसपी सिटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवटहिया टोला येथील मुरली निषाद यांना पन्नेलाल, धर्मेंद्र, जितेंद्र, राजन, गोकुळ अशी 5 मुले आहेत. पाच भावांच्या वाट्याला प्रत्येकी 12-12 फूट जमीन मिळाली होती, मात्र आरोपीने एक फूट अधिक जमीन घेतल्याने वाद झाला. यावरून सख्ख्या भावांमध्ये सतत वाद व्हायचे.

भावानेच घेतला भावाचा जीव एसपी सिटी यांच्या माहितीनुसार, मृत जितेंद्रची पत्नी आणि आरोपी धर्मेंद्रची पत्नी यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान, दोन्ही भाऊ काम करून घरी पोहोचले. पत्नींमधील वाद पाहून दोन्ही भाऊ एकमेकांना भिडले. अशातच मोठा भाऊ धर्मेंद्र याने लहान भाऊ जितेंद्रवर काठीने हल्ला केला. लोकांना काही समजण्यापूर्वीच धर्मेंद्रने जितेंद्रला काठीने बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे एसीपी सिटी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGorakhpurगोरखपूरPoliceपोलिसDeathमृत्यूArrestअटक