शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

मी लस घेणार नाही! नावाडी थेट आरोग्य कर्मचाऱ्याला भिडला; नदीकिनारी हाय व्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 2:11 PM

लसीकरण टाळण्यासाठी नावाड्यानं काढला पळ; वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मनस्ताप

बलिया: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल दिवसभरात देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणं गरजेचं आहे. मात्र अनेकांच्या मनात लसीकरणाबद्दल गैरसमज आहेत. त्यामुळे काहींनी अद्यापही लस घेतलेली नाही. लसीकरण करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी पोहोचताच काही जण पळ काढतात, तर काही जण थेट त्या कर्मचाऱ्यांना भिडतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातल्या बलियामध्ये घडला आहे.

बलिया जिल्ह्यात घडलेल्या दोन घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लसीकरण टाळण्यासाठी कोणी झाडावर चढतंय, तर कोणी आरोग्य कर्मचाऱ्याला भिडतंय, असे प्रकार बलियामध्ये घडले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण गरजेचं असल्याचं आरोग्य कर्मचारी स्थानिकांना समजावून सांगत होते. शरयू तटावर असलेल्या नावाड्यांना त्यांनी लस घेण्याचं आवाहन केलं. त्यावेळी एका नावाड्यानं आरोग्य कर्मचाऱ्याला जमिनीवर पाडलं. त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

लसीकरण करणाऱ्या पथकानं नावाड्याला लस घेण्यासाठी बोलावलं होतं. मात्र नावाड्यानं लस घेण्यास नकार दिला. त्यानंतरही कर्मचारी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे नावाडी नाराज झाला. त्यानं कर्मचाऱ्यांशी वाद घातला. एका कर्मचाऱ्याला त्यानं जमिनीवर पाडलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

लसीकरण टाळण्यासाठी हडियाकला गावातला एक तरुण थेट झाडावर चढला. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरण्याचं आवाहन केलं. जवळपास अर्धा तास कर्मचारी त्याला खाली येण्यास सांगत होते. अर्ध्या तासानं तरुण खाली उतरला. त्यानंतर त्याला लस टोचण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस