४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 08:21 IST2025-07-22T08:21:09+5:302025-07-22T08:21:36+5:30
१ वर्षापूर्वीही पत्नी युवकासोबत गेली होती. काही महिन्यांनी परतली आणि माफी मागून पुन्हा घरी राहू लागली.

४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात भवानीगंज इथं हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका ४० वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा १५ वर्ष छोट्या असलेल्या युवकासोबत पळून जात कोर्ट मॅरेज केले आहे. ही महिला ४ मुलांची आई आहे. ज्यातील मोठ्या मुलीचे वय १८ वर्ष, दुसरा १६ वर्षाचा मुलगा, तिसरा १२ तर चौथा ८ वर्षाचा आहे. मागील ४ वर्षापासून महिला आणि युवकाचे प्रेम प्रकरण सुरू होते. मला माझ्या पतीसोबत राहायचे नाही, मी ज्याच्यासोबत आले आहे त्याच्यासोबत राहायचे आहे असं या महिलेने सांगितले.
याबाबत पती रामचरण प्रजापती म्हणाला की, पत्नी कुठल्या तरी युवकासोबत जवळीक वाढवत असल्याचे कळताच मी मुंबईहून गावाला परतलो. मी मुंबईत टाइल्स लावण्याचं काम करत होतो. गावात आल्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्या भेटीगाठी थांबल्या त्यामुळे घरात वाद सुरू झाले. जवळपास १ वर्षापूर्वी पत्नी युवकासोबत गेली होती. काही महिन्यांनी परतली आणि माफी मागून पुन्हा घरी राहू लागली. अलीकडेच ती त्याच युवकासोबत पळून गेली असं त्यांनी सांगितले.
तसेच याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात दोन्ही बाजूची समझोता करून पत्नी आता प्रियकरासोबत राहील आणि मुले माझ्याकडे राहतील हे ठरले. आमच्या दोघांचे लग्न २८ वर्षापूर्वी झाले होते असं पती रामचरण याने सांगितले. पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मनातील भीतीही बोलून दाखवली. माझ्या जेवणात ती काही खायला देईल याची भीती वाटत होती. त्यामुळे ती प्रियकरासोबत गेली त्याला आक्षेप घेतला नाही असं सांगत पतीने सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, मी ४ वर्षापासून युवकाशी बोलतेय, सुरुवातीला आमची ओळख झाली, त्यातून हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो असं महिला जानकी देवीने सांगितले. आता या महिलेला मुलांची आठवणही येत नाही. १५ वर्ष छोट्या असलेल्या युवकाशी तिने कोर्टात लग्न केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये समझोता होऊन आता ही महिला तिच्या प्रियकरासोबत राहत आहे.