१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:54 IST2025-08-25T11:53:50+5:302025-08-25T11:54:33+5:30
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत पुन्हा महिलेला पतीच्या स्वाधीन केले. परंतु ही विवाहित महिला फक्त १ रात्र पतीसोबत राहिली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रियकराकडे गेली.

१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
रामपूर - उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका गावात असा प्रकार समोर आला आहे जो ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी एका विवाहित महिलेने पंचायतीत असा अजब प्रस्ताव ठेवला तो ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले. मला महिन्यातून १५ दिवस पतीसोबत आणि १५ दिवस प्रियकरासोबत राहायचे आहे असं तिने स्पष्ट सांगितले. या महिलेचा प्रस्ताव ऐकून पंचायतीत बसलेले लोक कुजबुज करू लागले. ही महिला आतापर्यंत एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल १० वेळा प्रियकरासोबत पळाली आहे.
माहितीनुसार, अजीम नगर येथील एक विवाहित महिला लग्नानंतर दीड वर्षांनी शेजारील गावात राहणाऱ्या युवकासोबत पळाली. लग्नापासूनच तिचे त्या युवकाशी प्रेमसंबंध होते. महिला त्या युवकासोबत घरातून पळून गेली होती. त्यावेळी पंचायतीसमोर हा विषय येताच महिलेला पतीसोबत घरी पाठवले. त्यानंतरही ही महिला प्रियकरासोबत पळून गेली. तिने वर्षभरात १० वेळा प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी पंचायत अथवा पोलीस यांच्या मदतीने तिला परत आणण्यात आले. अलीकडेच ८ दिवसांपूर्वी ती घरातून गायब झाली होती. त्रस्त झालेल्या पतीने पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत पुन्हा महिलेला पतीच्या स्वाधीन केले. परंतु ही विवाहित महिला फक्त १ रात्र पतीसोबत राहिली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रियकराकडे गेली.
पंचायतीसमोर अजब प्रस्ताव
पती जेव्हा पत्नी आणि प्रियकराला समजवण्यासाठी गेला, तेव्हा पुन्हा या प्रकरणी पंचायत बोलवण्यात आली. यावेळी पंचायतीसमोर पतीने हात जोडून पत्नीला घरी येण्यासाठी विनवणी केली. परंतु त्यावेळी महिलेने अनोखा प्रस्ताव पंचायतीसमोर ठेवला. ती म्हणाली, मला या दोघांसोबत राहायचे आहे. महिन्यातील १५ दिवस पतीच्या घरी आणि १५ दिवस प्रियकराच्या घरी राहीन. महिलेचे हे विधान ऐकून पंचायतीत खळबळ माजली. त्यावेळी पतीने निराश होऊन पत्नीसमोर हात जोडले आणि मला माफ कर, आता तू तुझ्या प्रियकरासोबत राहा असं सांगितले.
गावात सगळीकडे चर्चा
दरम्यान, या महिलेच्या प्रस्तावाची आणि पतीने दिलेल्या उत्तराची जिल्ह्यात सगळीकडे चर्चा सुरू आहे. आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच हा प्रकार पाहिला असं गावातील वृद्ध व्यक्ती सांगतात, सामान्यपणे पंचायतीसमोर पती-पत्नी यांच्यातील वादावर तोडगा काढत मध्यस्थी केली जाते परंतु १५-१५ दिवसांचा फॉम्युला आजपर्यंत कुणीही ऐकला नाही. विवाहित महिलेचा अजब प्रस्ताव केवळ सामाजिक परंपरेवर प्रश्नचिन्ह उभे करत नाही तर नात्यांमधील मर्यादांनाही आव्हान देत आहे.