शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! लग्नासाठी दबाव टाकल्याने प्रियकर बनला राक्षस; महिलेसह तिच्या मुलाचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:24 IST

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बिल्हौरच्या बलरामनगरमध्ये रविवारी पहाटे पारिचारिका आणि तिच्या 11 वर्षीय मुलाची महिलेच्या प्रियकराने गळा आवळून हत्या केली. यानंतर ही घटना आत्महत्या असल्याचे दाखवण्यासाठी मुलाचा मृतदेह लटकवण्यात आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने हत्येची कबुली देत ​​हत्येचे रहस्य उलगडले आहे.

पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंग यांनी सांगितले की, बलरामनगर येथील रहिवासी अशोक शुक्ला यांच्या घरात भाड्याच्या खोलीत राहणारी महिला आणि तिचा मुलगा मृत अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर खोलीचा दरवाजा उघडा दिसला. खरं तर बिधानू साढू येथील राजकुमार यांची पत्नी सीमा दिवाकर (38) हिचा मृतदेह पलंगावर पडला होता. तर इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आदित्य (11) या मुलाचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. 

महिलेसह तिच्या मुलाचा घेतला जीव  मृत सीमा कन्नौज या जलालाबाद येथील सीएचसीमध्ये पारिचारिका म्हणून कार्यरत होत्या. पतीसोबत वाद झाल्यानंतर त्या सुमारे चार वर्षांपासून या वस्तीत भाड्याने राहत होत्या. पोलिसांनी त्याच घरात राहणाऱ्या अन्य तीन भाडेकरूंची चौकशी केली असता, वस्तीत राहणारा नरेंद्र यादव हा सकाळी आपल्या खोलीतून बाहेर आल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची कोठडीत चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याची या मृत महिलेशी मैत्री होती. ती माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळेच रविवारी पहाटे त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. मुलाने आपल्या आईची हत्या करताना आरोपीला पाहिले होते. म्हणून आरोपीने 11 वर्षीय चिमुकल्याची हत्या करून मृतदेह लटकवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्येची माहिती आरोपी नरेंद्रच्या काकाने पोलीस नियंत्रण कक्षात दिली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस