शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"पत्नी स्पर्श करून देत नाही...", पतीची कोर्टात धाव; 'ती' तृतीयपंथी असल्याचा केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 22:25 IST

उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील न्यायालयातघटस्फोट घेण्यासाठी एका व्यक्तीने धाव घेतली असून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पत्नी तृतीयपंथी असल्याने घटस्फोट घेत असल्याचे संबंधित पतीने सांगितले. आता न्यायालयाने पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कानपूर येथील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या या व्यक्तीच्या मागणीने नातेवाईक देखील चक्रावून गेले. 

दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या व्यक्तीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला आहे की, दोन वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले मात्र लग्नानंतर पत्नीने शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत. ती मला स्पर्श देखील करून देत नाही. डॉक्टरांनी तपासणी केली असता पत्नीच्या शरीराचे अनेक अवयव विकसित झाले नसल्याचे आढळून आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने सीएमओला पाच डॉक्टरांचे पॅनल तयार करून पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सीएमओला तपास अहवाल लवकरच न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

फसवणुकीचा गुन्हा दाखलपत्नीच्या माहेरच्यांनी आपली फसवणूक केली असल्याचे म्हणत या प्रकरणी पतीने २०२१ मध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता. परंतु तपासकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी न करताच या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला. आता पतीने या अहवालाला न्यायालयात आव्हान दिले आहे.

कानपूर जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्येष्ठ वकील विजय बक्षी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यानुसार जर पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसेल तर या आधारे घटस्फोट घेता येतो. दरम्यान, संबंधित पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १२ अंतर्गत विवाह रद्द करून वेगळे होण्यासाठी विनंती केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालयmarriageलग्नDivorceघटस्फोट