शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"माझी नाही तर दुसऱ्याचीही...", प्रेमप्रकरणातून 'गोळीबार', प्रियकर ठार तर प्रेयसी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 16:26 IST

बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रियकराने आपल्या प्रेयसीला गोळी घातली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर उपचार सुरू असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. गोळी झाडल्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी दोघांनाही रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल जप्त केले आहे.

दरम्यान, राजू कुमार असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे शेजारीच राहणाऱ्या तरूणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. मुलाला मुलीशी लग्न करायचे होते. पण, मुलीने नकार दिल्याने त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. खरं तर एकतर्फी प्रेमातून तरूणाने गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत राज कुमार हा पाटण्यात खासगी नोकरी करण्यासोबतच शिक्षण घेत होता. त्याचे वडील शेती आणि गुरे पाळून उदरनिर्वाह करतात. तर मुलगी विद्यार्थिनी आहे. मुलगी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. 

भररस्त्यात थरारमुलीचे लग्न ठरले होते, हे कळताच तरूणाला राग अनावर झाला. घटनेच्या दिवशी तरूणी क्लासवरून घरी परतत होती. यादरम्यान राजूने तिला थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तरूणीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर संतापलेल्या राजूने तरुणीवर दोन वेळा गोळ्या झाडल्या मुलगी जमिनीवर पडल्यावर तरुणाने स्वतःवरही गोळी झाडली. यानंतर ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले आणि तेथे उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले.

दोन महिन्यांनंतर होतं लग्न अन्...गोळीबाराच्या घटनेनंतर मुलीच्या आईने सांगितले की, मुलीचे लग्न ठरले होते आणि दोन महिन्यांनी तिचे लग्न होणार आहे. अशातच ही घटना आमच्या कानावर पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरूणी शेजारीच राहतात. प्राथमिक माहितीनुसार, हे एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे दिसते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितांनी तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई केली जाईल.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूPoliceपोलिस