शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime: रात्री प्रेयसीच्या बेडरूममध्ये पोहचला प्रियकर; सकाळी लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:08 IST

बिहारच्या मोतिहारी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोतिहारी : बिहारच्या मोतिहारी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाची हत्या करण्यात आली आणि मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आणि लोकांची गर्दी झाली. ही घटना पूर्व चंपारण जिल्ह्यातील घोरासहन पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलीस ठाण्याच्या धुमनगर गावात ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी एका तरुणाचा फासावर लटकलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह गावातीलच राजवंशी यादव यांचा 16 वर्षीय मुलगा सनी कुमारचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, त्याच गावातील राजा ठाकूर यांच्या मुलीसोबत सनीचे प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे. रात्री उशिरा जेवण करून सनी घरातून हॉलमध्ये झोपण्यासाठी निघाला, मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह शेजारच्या घरात आढळून आला. बंद खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. रात्रीच्या अंधारात सनी आपल्या प्रेयसीच्या बेडरूममध्ये पोहोचला होता, ज्याला संबंधित प्रेयसीच्या आईने पाहिले होते. यानंतर दोघांनाही खोलीतच बाहेरून कोंडून ठेवण्यात आले. अन् दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृत तरूणाच्या आईचा टाहोया घटनेनंतर राजा ठाकूर यांचे संपूर्ण कुटुंब घरातून पळून गेले. मृतदेह सापडल्यानंतर एसपी डॉ. कुमार आशिष यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हत्या आहे की आत्महत्या याचा खुलासा होईल. मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्या तरी दुसरीकडे मृत तरूणाची आई मात्र रडत रडत आपले कोणाशीही वैर नसल्याचे सांगत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस