बिहारमध्ये ‘सीरियल किसर’ची दहशत; अचानक येतो अन् ‘किस’ करून पळतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 08:06 IST2023-03-14T08:06:14+5:302023-03-14T08:06:53+5:30

अचानक एक तरुण येतो, महिलेला मागून पकडतो आणि बळजबरीने चुंबन घेतो. लगेचच तिथून फरार होतो.

in bihar serial kisser terror comes suddenly and kisses and runs away | बिहारमध्ये ‘सीरियल किसर’ची दहशत; अचानक येतो अन् ‘किस’ करून पळतो

बिहारमध्ये ‘सीरियल किसर’ची दहशत; अचानक येतो अन् ‘किस’ करून पळतो

पाटणा:बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका ‘सीरियल किसर’मुळे खळबळ उडाली आहे. आरोपी तरुण असून तो अनोळखी महिला आणि मुलींना अचानक ‘किस’ करतो आणि पळून जातो. त्याचा ३ मिनिटे ५० सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. १० मार्च रोजी जमुईच्या सदर हॉस्पिटलच्या आवारात चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचारी महिला मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. अचानक एक तरुण भिंतीवरून उडी मारून आवारात येतो, महिलेला मागून पकडतो आणि बळजबरीने चुंबन घेतो. महिला विरोध करते, पण लगेचच तो तिथून फरार होतो. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

घटनेनंतर महिलेने पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे, घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप आरोपीची ओळखही न पटल्यामुळे अनेकांनी महिलांना लैंगिक छळ आणि अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. तथापि, तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक होईल, अशी माहिती जमुईच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: in bihar serial kisser terror comes suddenly and kisses and runs away

टॅग्स :Biharबिहार