काश्मीरमध्ये महिनाभरात २७ अतिरेक्यांचा केला खात्मा; पुलवामात २ अतिरेक्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 06:51 IST2022-06-01T06:51:06+5:302022-06-01T06:51:15+5:30

निम्म्यापेक्षा अधिक विदेशी

In a month, 27 terrorist were killed in Kashmir | काश्मीरमध्ये महिनाभरात २७ अतिरेक्यांचा केला खात्मा; पुलवामात २ अतिरेक्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये महिनाभरात २७ अतिरेक्यांचा केला खात्मा; पुलवामात २ अतिरेक्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन स्थानिक अतिरेकी ठार झाले. सोमवारी याच जिल्ह्यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले होते. गत २४ तासांत चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मे महिन्यात सुरक्षा दलाने काश्मीर खोऱ्यात १५ चकमकीत २७ अतिरेक्यांना ठार मारले आहे. या महिन्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक विदेशी आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्याच्या अवंतीपोरा भागात राजपोरामध्ये सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दलाने विशेष मोहीम सुरू केली. या चकमकीत दोन स्थानिक अतिरेकी मारले गेले. घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफल आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, मारले गेलेले अतिरेकी हे एका सरकारी कर्मचाऱ्यासह अन्य नागरिकांच्या हत्येत सहभागी होते. 

Web Title: In a month, 27 terrorist were killed in Kashmir