पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताने कंडोमची मोठी ऑर्डर दिलेली; १९७१ मध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:26 IST2024-12-24T15:21:35+5:302024-12-24T15:26:02+5:30
१९७१ मध्ये भारताचे पाकिस्तान विरोधात मोठं युद्ध झालं होतं.

पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताने कंडोमची मोठी ऑर्डर दिलेली; १९७१ मध्ये...
भारतीय सेनेने १९७१ मध्ये पाकिस्तानविरोधात झालेल्या लढाईत मोठी कामगिरी केली होती. जवानांच्या कामगिरीच्या तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. भारतीय सैन्याने या लढाईत अनेक युक्त्या वापरल्या होत्या. या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने शेकडो कंडोम ऑर्डर केले होते.
डिसेंबर १९७१ मध्ये भारत बांगलादेशच्या मुक्तीसाठी पाकिस्तानशी लढत होता. युद्धादरम्यान, भारतीय नौदलाने माइन वापरून पाकिस्तानी जहाजांवर हल्ला करण्यासाठी आणि बांगलादेश यशस्वीपणे मुक्त करण्यासाठी शेकडो कंडोम ऑर्डर केले.
या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय एअरबसवर हल्ला केला. यामुळे भारतीय नौदलाने पाकिस्तानवर हल्ला वाढवला. यावेळी चितगाव बंदरावर भारतीय सैन्याने पाकिस्तानी जहाजांना उडवून त्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. मात्र, जहाजाच्या खाली 'लिंपेट माईन' नावाचा भूसुरुंग ठेवला जाणार होता, मात्र त्याचा स्फोट अवघ्या ३० मिनिटांत होणार होता.
यामुळे या स्फोटकाला पाण्यापासून वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान शेकडो कंडोम ऑर्डर केले. एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कंडोम लिंपेट माइनवर ठेवण्यात आले होते, जेणेकरून माइन पाण्यात सुरक्षित राहील आणि वेळेत स्फोट होईल.
भारतीय नौदलाचे चितगाव बंदर ऑपरेशन हे १९७१ च्या युद्धादरम्यानच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पाकिस्तानच्या शिपिंग आणि पुरवठा मार्गांना खराब करण्याच्या भारताच्या धोरणाचा एक भाग होता.
१९७१ चे भारत-पाक युद्ध हे दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले तिसरे युद्ध होते.